Kolhapur Patgaon Dam
Kolhapur Patgaon Damagrowon

Kolhapur Patgaon Dam : कोल्हापुरातील धरणाच्या पाण्यावर अदानींची नजर, जल विद्युत केंद्रास कृती समितीचा जोरदार विरोध

kolhapur Patgaon Villagers : अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाला पाटगाव धरणाचे पाणी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
Published on

Kolhapur Patgaon Dam : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुजरातचे उद्योगपती गौतम अदानी यांचा जल विद्युत वीज निर्मीती प्रकल्प येत आहे. दरम्यान अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणाचे पाणी देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. याला गावातील ग्रामस्थांसह भुदरगड तालुका कृती समितीने विरोध केला आहे.

पाटगाव धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अदानी उद्योग समूहाच्या वीज निर्मिती प्रकल्पाला देऊ नये, अशी मागणी करत पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीच्या वतीने गारगोटी येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील माणगाव खोऱ्यातील अंजिवडे गावात उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी कंपनीचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट २१०० मेगाव्हॅटचा वीज निर्मिती प्रकल्प उभा करण्यात येत आहे. या प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून प्रकल्प उभारण्याचे काम गुप्तपणे सुरू करण्यात आले आहे.

यासाठी १४० हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन झाले असून त्यापैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा करण्यात येणार आहे. यासाठी अंजीवडे गावाच्या माथ्यावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातून टनेल सदृश पाइपलाइन द्वारे पाणी अंजिवडे येथे उभारल्या जाणाऱ्या जलसाठ्यात सोडले जाणार आहे. मात्र, याला पाटगाव मधील शेतकऱ्यांनी विरोध करत गारगोटी येथील तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढला आहे.

Kolhapur Patgaon Dam
Kolhapur Bhanamati : संरपंचाच्या रानात जादूटोणा, कोल्हापुरातील तळंदगे गावचा प्रकार

पाटगाव धरणाच्या माध्यमातून या क्षेत्रातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा वापर करावा लागतो. दरम्यान याबाबत गावकऱ्यांना कुठल्याही प्रकारची माहिती न देता आणि विश्वासात न घेता या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. राज्य सरकारने याबाबतचा आपली भूमिका केंद्राकडे मांडली त्यावेळी भुदरगड मधल्या लोकप्रतिनिधींना याची कल्पना होती का? असा सवाल ग्रामस्थानी करत गारगोटी येथील क्रांती चौकात तहसीलदार कार्यालय समोर ठिय्या आंदोलन केले.

तर सरकारने या प्रकल्पासंदर्भात ठोस निर्णय नाही घेतला तर प्रसंगी कोणत्याही टोकाची लढाई करू पण पाटगाव धरणातील एक थेंब ही पाणी या प्रकल्पाला देऊ देणार नाही अशी भूमिका कृती समितीने मांडली. यामुळे येत्या काळात अदानींच्या या प्रकल्पा विरोधात पाटगाव धरण क्षेत्रातील गावकरी आणि सरकार यांच्या संघर्ष निर्माण होण्याचे दाट चिन्ह निर्माण झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com