Health Department Recruitment : अखेर मुहूर्त लागला; आरोग्य विभागात मोठी भरती, मुश्रीफ यांनी केली घोषणा

Class 3 Recruitment : खासगी रूग्णालयांच्या व्यवस्थेच्या धर्तीवर राज्यातील शासकीय रुग्णालयात देखील बदल करण्याचा विचार असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : सुविधा आणि व्यवस्थांमुळे नागरीकांचा कल हा खाजगी रूग्णालयाकडे दिसत आहे. खासगी रूग्णालयात प्रशासकीय विभाग आणि वैद्यकीय विभाग वेगळे असल्यानेच हा बदल दिसत आहे. याच पार्श्वभूमिवर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी, शासकीय रुग्णालयात बदल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. याबाबत, शासनस्तरावर विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी विधानसभेत बुधवारी (२० रोजी) दिली. सुभाष धोटे यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

'खासगी रूग्णालयांच्या व्यवस्थेचा दाखला देताना, तेथे प्रशासकीय कामात डॉक्टरांना लक्ष देण्याची गरज नसते. यासाठी वेगळी यंत्रणा काम करते. याच धर्तीवर राज्यातील शासकीय रुग्णालयात देखील बदल करण्याचा विचार शासन करत आहे', असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

Hasan Mushrif
Devendra Fadnavis : प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार

तसेच, 'कोरोना काळात चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते. हे साहित्य जेम पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती यावर लक्ष ठेवत होती. मात्र यात अनियमितता आढळल्यास चौकशी करण्यात येइल', असेही मुश्रीफ म्हणाले.

रिक्त पदांची भरती

राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयातील वर्ग १, वर्ग २ रिक्त पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत एप्रिल २०२४ पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif
Medical Services : वैद्यकीय सेवेत हवा सेवाभाव

क्लास ३ आणि क्लास ४ भरती

वर्ग ३ संवर्गाच्या ५६०० पेक्षा जास्त रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया टी सी एस कंपनीमार्फत सुरू आहे. ज्याचा डिसेंबर अखेर आदेश निघणार आहे. तसेच वर्ग ४ पदांची भरती बाह्य तत्वाद्वारे लवकर करण्यात येईल, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

विधानसभेत भरतीचा विषय

राज्याच्या आरोग्य विभागाबात सुभाष धोटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावरील चर्चेत सदस्य नाना पटोले, डॉ. राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, प्रतिभा धानोरकर, अमित देशमुख, प्रणिती शिंदे यांनी चर्चेत भाग घेतला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com