sandeep Shirguppe
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये भानामती सारख्या अघोरी कृत्ये वारंवार घडत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात तळंदगे या गावचे लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ हे निवडून येऊन एक वर्ष झाले.
सरपंचाला पदभार स्वीकारायला वर्षपूर्ती झाली. त्याच दिवशी त्यांच्या शेतात भानामती करणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सदरची बाब संदीप पोळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः शेतात जाऊन या सर्व वस्तू एकत्र करत त्याची होळी केली.
संदीप पोळ यांच्या शेतात अज्ञातांनी खिळे, टाचण्या, लिंबू, नारळ, गुलाल, कुंकू अशा वस्तू टाकून भानामती आणि करणी करण्याचा प्रयत्न केला.
करणी, जादूटोणा आणि भानामती प्रकाराला आपण घाबरत नसल्याचे संदीप यांनी सकाळशी बोलताना माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी २०१३ सालीच कायदा बनवल्याचं यांनी सांगितले आहे.
दरम्यान मागच्या दोन दिवसांपूर्वी तळंदगे गावातील एका ग्रामपंचायत सदस्याच्या दारात कोंबड्या कापून टाकल्याचाही प्रकार घडला होता.