Kolhapur Sugarcane : साखर कारखाने म्हणतात १०० रुपये द्यायला परवडत नाही, जिल्हाधिकारी भूमिका घेणार का?

Kolhapur Sugar factories : कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपये दिला नसल्याचे चित्र आहे.
Kolhapur Sugarcane
Kolhapur Sugarcaneagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane Rate : राज्यातील उसाचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाच्या दरासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले. दरम्यान शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार उसाला ४०० रुपये जादा दराची मागणी करण्यात आली होती. दरम्यान यावर जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करत यंदाच्या हंगामात एफआरपीपेक्षा १०० अतिरिक्त तर मागील हंगामातील एफआरपीवर १०० रुपये जादा दर देण्याचे ठरले होते. परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप एकही रुपये दिला नसल्याचे चित्र आहे.

मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला अतिरिक्त पैसे देण्याबाबत जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी असमर्थता दाखवली आहे. दरम्यान या साखर कारखान्यांनी पैसे कसे देता येत नाहीत याबाबत लेखी कळवले आहे. केवळ काही कारखान्यांनी पैसे देण्याची समर्थता दर्शवली आहे.

यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना व आंदोलन अंकुश यांनी मागील हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या मध्यस्थीने ज्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजारांपेक्षा कमी दर दिला आहे, त्यांनी शंभर रुपये तर तीन हजारांपेक्षा अधिक दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये शेतकऱ्यांना देण्याचा तोडगा निघाला होता.

दोन महिन्यात साखर आयुक्तांची मान्यता घेऊन दिले जाणार होते. मात्र, हंगाम संपत आला तरी केवळ सात कारखान्यांनी अतिरिक्त पैसे दिले आहेत किंवा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इतर सोळा कारखान्यांनी मात्र हे पैसे देण्यास असमर्थता दर्शवली आहे.

पैसे देण्याची जिल्हा प्रशासनाची जबाबदारी

जिल्हाधिकायांनी मध्यस्थी करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचे कबूल केले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या हातात दमडीही पडलेली नाही. हे पैसे देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

Kolhapur Sugarcane
Sugarcane Season : साखर कारखान्यांचा मनमानी कारभार अन् वशिलेबाजीला वैतागलेला शेतकरी तोडणीसाठी लावतोय उभ्या उसाला काडी

या कारखान्यांनी दर्शवली तयारी

शरद, दत्त शेतकरी, शाहू, अथर्व, जवाहर, मंडलिक.

कारखान्यांनी अशी दिलीत कारणे...

राजाराम - उत्पन्न कमी असल्याने प्रतिटन २९०० रुपयांपेक्षा अधिक दर देऊ शकत नाही. वारणा - एफआरपी/ आरएसएफपेक्षा जादा दर दिल्याने अतिरिक्त दर देऊ शकत नाही. कुंभी - विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार प्रस्ताव सादर केलेला नाही. अथणी - वारंवार कळवूनही प्रस्ताव सादर केलेला नाही.

गुरुदत्त - वारंवार कळवूनही प्रस्ताव सादर केलेला नाही. गायकवाड - विशेष लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार प्रस्ताव सादर केलेला नाही. डी. वाय. पाटील - ५० रुपयांपर्यंत अतिरिक्त्त दर अदा केलेला आहे. आजरा - एफआरपीपेक्षा १७६ रुपये जादा दिल्याने अतिरिक्त दर देऊ शकत नाही.

गडहिंग्लज -२०२२-२३ मध्ये कारखाना बंद राहिला, बिद्री - एफआरपीपेक्षा ११९.४५ रुपये जादा दिले. भोगावती - एफआरपीपेक्षा ५.६९ रुपये जादा दर दिला, अतिरिक्त दर अशक्य. पंचगंगा - प्रस्ताव सादर नाही, घोरपडे - प्रस्ताव सादर नाही, दालमिया - खासगी असल्याने लागू होत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com