Organic Cultivation : राज्यातील जमीन सेंद्रिय लागवडीखाली आणण्याचे धोरण

Natural Agriculture Mission : डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील २५ लाख हेक्टर जमीन सेंद्रिय लागवडीखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे.
Subhash Salve
Subhash SalveAgrowon
Published on
Updated on

Ambajogai News : ‘‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत महाराष्ट्रातील २५ लाख हेक्टर जमीन सेंद्रिय लागवडीखाली आणण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र पातळीवर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. प्रशिक्षणार्थीनी सर्व प्रकारचे सेंद्रिय शेती विषयक ज्ञान घेऊन अडचणी दूर करणे गरजेचे आहे,’’असे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) प्रकल्प संचालक श्री. सुभाष साळवे म्हणाले,

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत गटप्रमुख व सदस्य शेतकरी यांचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

Subhash Salve
Organic Toxic Free Farming : तरुणांनी विषमुक्त शेतीची कास धरावी : राहिबाई पोपरे

या वेळी त्यांनी सेंद्रिय शेतीची गरज पटवून दिली. कुटुंबाला आवश्यक अन्नधान्य सेंद्रिय पद्धतीने पिकवा असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला मंचावर आत्मा प्रकल्प संचालक सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. वसंत देशमुख व दीनदयाल शोध संस्थान विशेष आमंत्रित सदस्य, कमलाकर आंबेकर यांची उपस्थिती होती. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाला अंबाजोगाई व धारूर तालुक्यांतील ६५ शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, आपल्या शेतावर निर्माण करता येणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, सेंद्रिय उत्पादनाचे प्रमाणीकरण, प्रमाणीकरण व मूल्यवर्धन यांसारख्या विविध घटकांवर शेतकऱ्यांना माहिती व अनुभव देऊन सक्षम करण्यात येणार आहे.’’

Subhash Salve
Organic Farming : सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे

श्री. शिनगारे म्हणाले, ‘‘विषमुक्त अन्नधान्य निर्माण करण्यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेऊन सक्षमपणे आपल्या शेतावर सेंद्रिय निविष्ठा निर्माण कराव्यात. सेंद्रिय शेतीमध्ये प्रमाणिकारणाला अनन्य साधारण महत्त्व असून या व मूल्यवर्धनाच्या प्रक्रियेत कृषी विभाग शेतकऱ्याला सहकार्य करेल,’’ असे आश्‍वासित केले.

या वेळी श्री. आंबेकर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट सर्वांसमोर मांडून एकात्म मानवदर्शन तत्त्वज्ञानाची मांडणी केली. शेतीसह सर्वच व्यवहारात स्वदेशीचा आग्रह करून अंत्योदय साध्य करावे असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटन सत्राचे संचलन पीक संरक्षण शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप सांगळे यांनी, तर आभार प्रदर्शन पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र कोरके यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com