Dharashiv News : हराळी (ता. लोहारा) येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्रात रोटरी इंटरनॅशनलच्या ग्लोबल ग्रँट या संकल्पनेतून शेतकऱ्यांसाठी रोटरी कृषी अवजारे बँकेची नुकतीच स्थापना करण्यात आली. या अवजारे बँकेत ३३ प्रकारची एकूण ५९ आधुनिक अवजारे आणि शेतीत लागणारी साधने उपलब्ध आहेत.
रोटरीच्या प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या हस्ते या बँकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कृषी अवजारे बँकेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती औजारांची अतिअल्प दरात उपलब्धता होणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी मोठा हातभार लागणार आहे.
ज्ञानप्रबोधिनीचे विद्यमान कार्यवाह सुभाषराव देशपांडे यांनी आधुनिक शेतीचालक (फार्म ऑपरेटर) संकल्पना मांडली. या पार्श्वभूमीवर आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना आणि विशेष करून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधुनिक अवजारे वेळेत आणि योग्य भाड्याने मिळावीत यासाठी अवजारे बँक ही संकल्पना पुढे आहे.
लातूर येथील रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन तसेच अमेरिकेतील रोटरी क्लब ऑफ एम्मुस यांनी एकत्र येऊन ही बँक स्थापन केली. डॉ. शुभांगी ठाकूर यांच्यासह विविध रोटरी संस्थानी अर्थसाहाय्य केले. या सर्व प्रकल्पाचे नियोजन, सर्वेक्षण, अवजारे निश्चिती, खरेदीची उत्तम ठिकाणे शोधणे आणि प्रत्यक्ष खरेदी ही सर्व पूर्वतयारी गेले आठ महिने चालू होती.
या अवजारे बँकेच्या माध्यमातून ट्रॅक्टर मालकांना आपल्या भागात सहज उपलब्ध नसलेली अवजारे, तसेच याभागात नसलेली स्वयंचलित अवजारे या सोबत सहज शेतकऱ्यांना वापरण्यासाठी उपलब्ध असलेली मनुष्यचलीत अवजारे उपलब्ध होणार आहेत. हराळी (ता. लोहारा) येथील ज्ञान प्रबोधनी केंद्रामध्ये या रोटरी कृषी अवजारे बँकेचे रोटरीचे प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. या वेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह सुभाषराव देशपांडे होते. यासोबत आजूबाजूच्या पाच जिल्ह्यांतील रोटरीचे सदस्य, परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.