
Ahilyanagar News : महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग व राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे यांच्यातील समन्वय खूप चांगला आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठात शेतकरीभिमुख संशोधन सुरू आहे. खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेमध्ये महत्त्वाच्या विविध १० घटकांवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे विद्यापीठाचे तंत्रज्ञान निश्चितपणे शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचेल. तसे प्रयत्न असतील असे मत कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.
कृषी विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषी विद्यापीठात विभागस्तरीय दोन दिवसीय खरीप हंगाम पूर्व कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. शरद गडाख होते. कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी अधिकाऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला.
कृषी आयुक्त सूरज मांढरे, विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नाईकवाडी, आत्मा संचालक अशोक किरनाळे, संचालक विनयकुमार आवटे, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने (पुणे), सुभाष काटकर (नाशिक), अजय कुलकर्णी (कोल्हापूर), मेघना केळकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे उपस्थित होते.
डॉ. शरद गडाख म्हणाले, की विद्यापीठातील प्रयोगशाळेमध्ये गुणवत्तापूर्ण जैविक खते, जैविक औषधे तयार केली जातात. ती राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी खात्याने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले. येणारा खरीप हंगाम चांगला होईल. पावसाचा अंदाजही चांगला असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व पोकरासारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी ७१ लाख शेतकऱ्यांपैकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचू शकतो.
विविध मुद्द्यांवर प्रात्यक्षिकांचे आयोजन
महात्मा फुले कृषी विद्यापीठात दोन दिवसीय कार्यशाळेत राज्यभरातून अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत. येथे मातीचा नमुना घेणे, बीज प्रक्रिया मोहीम, घरगुती चाचणी पद्धतीने बियाणे उगवण क्षमता तपासणी मोहीम, फळबाग लागवडीसाठी सी. आर. ए. तंत्रज्ञानाचा वापर, हुमणी कीड एकात्मिक व्यवस्थापन, ऊस लागवडीसाठी रोपे तयार करणे, भात पिकामध्ये युरिया ब्रिकेट्सची उपलब्धता व वापर वाढविणे, बोंड अळी एकात्मिक व्यवस्थापन, शेती शाळा घेणेबाबत व शेतावर जैविक खते तसेच बायोचार निर्मिती या विविध मुद्द्यांवर प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.