Kharif Season 2025
Kharif Season 2025Agrowon

Kharif Season 2025 : शेतकऱ्यांनो, घरचे बियाणे वापरा ; खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे आवाहन

Crop Seed : शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात नवीन बियाणे, औषधे, खते दाखल होण्यास प्रारंभ होईल. खर्चातील बचत साधण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही घरातील बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
Published on

Kolhapur News : गडहिंग्लज, जि कोल्हापूर ः शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात नवीन बियाणे, औषधे, खते दाखल होण्यास प्रारंभ होईल. खर्चातील बचत साधण्यासाठी शेतकऱ्यांनी यंदाही घरातील बियाण्यांचा वापर पेरणीसाठी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यासाठी कृषी सहायक बांधावर जाऊन बियाणे प्रक्रिया, उगवण क्षमतेच्या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांत प्रबोधनाची मोहीम राबवणार आहेत.

तालुक्यात उसासह ४२ हजार हेक्टरमध्ये खरिपाचे क्षेत्र असते. ऊस हे तालुक्याचे नगदी पीक असून त्याखालोखाल सोयाबीनचा क्रमांक लागतो. उसाच्या बरोबरीने सोयाबीनचे क्षेत्र असते. सोयाबीनला सध्या दर कमी मिळत असला तरी पेरणीच्या पार्श्वभूमीवर त्याचे दर वाढतात. बाजारातील बियाण्यांचे दर किलोमागे ९० रुपयांपासून सुरू होतात.

Kharif Season 2025
Soybean Seed Production : सोयाबीन ग्रामबीजोत्पादनासाठी घरचे बियाणे मोहीम

दर्जेदार बियाण्यांचे दर १२० रुपयांहून अधिक असतात. क्षेत्र अधिक असल्याने बियाणेही मोठ्या प्रमाणात लागतात. दरम्यान, वर्षभर दर कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने घरातच सोयाबीनचा साठा केला आहे. येत्या खरीप हंगामात त्याची उगवण क्षमता तपासून बियाण्यांची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात येत आहे. उगवण क्षमता व बीज प्रक्रियेबाबत कृषी सहायक गावागावांत जाऊन दरवर्षीच मार्गदर्शनही करतात.

यंदा ही मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे धोरण आहे. राज्यस्तरावरील बैठकीतही शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरण्यासाठी परावृत्त करण्याच्या सूचना कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बाजारातील बियाण्यांचे वाढते दर लक्षात घेता घरचे बियाणे पेरणीसाठी वापरल्यास शेतकऱ्यांच्या लागवड खर्चात बचत होणार आहे.

पेरणीच्या पार्श्वभूमीवर साठा केलेल्या सोयाबीनची विक्री बियाणे म्हणून विक्री केल्यास अधिक दर मिळण्याची शक्यताही आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी आपल्यासह गावातील शेतकऱ्यांनाही बियाणे म्हणून सोयाबीनची विक्री करू शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com