Kahrif Seed Supply : हिंगोली जिल्ह्यात खरिपाच्या २७ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा

Kharif Season 2025 : हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये विविध पिकांची ३ लाख ५४ हजार ४५५ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : खरीप हंगामा २०२५ साठी हिंगोली जिल्ह्यासाठी विविध पिकांचा ७५ हजार ४९० क्विंटल बियाणे तसेच आणि कपाशी बियाण्याच्या १ लाख ५२ हजार पाकिटांची मागणी सार्वजनिक तसेच खाजगी बियाणे उत्पादकांकडे करण्यात आली.

३१ मे अखेरपर्यंत सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या २७ हजार ३०८ क्विंटल बियाण्याचा तसेच कपाशी बियाण्याच्या ७७ हजार ८४ पाकिटांचा पुरवठा करण्यात आला. ६ हजार ९११ क्विंटल बियाणे व कपाशी बियाण्याच्या १९ हजार ४७१ पाकिटांची विक्री झाली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये विविध पिकांची ३ लाख ५४ हजार ४५५ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. त्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील (महाबीज) बियाणे उत्पादकांकडे ७ हजार ८१९ क्विंटल आणि खासगी बियाणे कंपन्यांकडे ६७ हजार ६७१ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली.

Kharif Sowing
Seed Germination Test: बियाणे उगवणशक्ती चाचणीचे शेतकऱ्यांना दाखविले प्रात्यक्षिक

३१ मे अखेरपर्यंत सोयाबीनच्या ७३ हजार २९३ पैकी २६ हजार २१६ क्विंटल, तुरीच्या १ हजार ६७९ पैकी ९५४.५ क्विंटल बियाण्याचा, तर उडदाच्या १४० क्विंटल पैकी ५८ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला.

ज्वारीच्या १६८ पैकी १५ क्विंटल, बाजरीच्या २ क्विंटल, भाताच्या २ क्विंटल मक्याच्या ३६.५९ पैकी ५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. तिळाच्या १ क्विंटल, भुईमुगाच्या ५ क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला आहे.

Kharif Sowing
Dhule Fake Cotton Seeds: धुळ्यात २१ लाखांचे अवैध कापूस बियाणे जप्त

२ हजार ४७४ क्विंटल बियाण्याची विक्री..

आजवर विक्री झालेल्या बियाण्यामध्ये सोयाबीन ६ हजार ७६० क्विंटल, तूर १३५.७ क्विंटल, मूग ९ क्विंटल, उडीद ५.९ क्विंटल, मका ५० किलो बिण्याचा समावेश आहे. २० हजार ३९६ क्विंटल बियाणे शिल्लक होते.

कपाशी बियाणे १९ हजारावर पाकिटे विक्री...

जिल्ह्यात यंदा कपाशीची ३० हजार ४०० हेक्टरवर लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी विविध वाणांच्या १ लाख ५२ हजार बियाणे पाकिटांची मागणी खाजगी बियाणे उत्पादक कंपन्याकडे करण्यात आली आहे. आजवर ७७ हजार ८४ बियाणे पाकिटांचा पुरवठा झाला त्यापैकी १९ हजार ४७१ पाकिटांची विक्री झाली अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com