Seed Germination Test: बियाणे उगवणशक्ती चाचणीचे शेतकऱ्यांना दाखविले प्रात्यक्षिक

Soil Health Awareness: खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानात तिसऱ्या दिवशी पानेवाडी (ता. घनसावंगी) येथे शेतकऱ्यांना बियाणे उगवणशक्ती चाचणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
Seed Germination Test
Seed Germination TestAgrowon
Published on
Updated on

Jalana News: खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे सुरू असलेल्या विकसित कृषी संकल्प अभियानात तिसऱ्या दिवशी पानेवाडी (ता. घनसावंगी) येथे शेतकऱ्यांना बियाणे उगवणशक्ती चाचणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.पानेवाडी येथे बोलताना राजगुरुनगर (ता. खेड, जि. पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संचालनालयाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. थंगासामी यांनी शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य व माती परीक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी कापूस, तूर व सोयाबीन या पिकांवर मार्गदर्शन करताना मर रोगाच्या बंदोबस्तासाठी तुरीचा सुधारित गोदावरी या वाणाची लागवड करण्याचे आवाहन केले. उद्यानविद्या तज्ज्ञ सुनील कळम यांनी मोसंबीची लागवड व फळगळ नियंत्रण या विषयावर मार्गदर्शन केले.

Seed Germination Test
Sweet Orange Market : मोसंबीची आवक जेमतेम; दर दबावातच ; छत्रपती संभाजीनगर आणि जालना बाजारांतील स्थिती

परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विनायक इंगळे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय व शेळीपालनाची कास धरण्याचे आवाहन केले. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शशिकांत पाटील यांनी शेतीआधारित प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन याबबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Seed Germination Test
Indian Dairy Sector: भारत जगाचे दुग्धव्यवसाय केंद्र बनेल: जयेन मेहता

विशाल तौर यांनी कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन वाढीच्या निविष्ठांबाबत माहिती दिली. पानेवाडीचे सरपंच तुळशीराम मापारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कृषिभूषण मदनराव वाडेकर, प्रगतिशील शेतकरी उद्धव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य राम सावंत, ‘आत्मा’चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मुरलीधर गाढवे, उपकृषी अधिकारी दत्त कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी, सरपगव्हाण, यावलपिंप्री तांडा आणि जालना तालुक्यातील नेर, सेवली आणि एरंडवडगाव या गावात अभियान पथकांनी हजेरी लावली. या पथकासमवेत असलेल्या कृषी रथाने शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com