Kolhapur Flood : राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे झाले बंद, आलमट्टीचा विसर्ग केला कमी, पाणी पातळीत इंचाइंचाने घट

Radhnagari Dam : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलीत सर्व दरवाजे आज बंद झाले यामुळे पॉवर हाऊसमधून फक्त १ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
Kolhapur Flood
Kolhapur Floodagrowon
Published on
Updated on

Koyna Dam : कोयना धरणातून कृष्णा नदी पात्रात विसर्ग वाढल्याने पाणी पातळीत वाढ झाली होती. परंतु मागच्या ३ दिवसांपासून पाऊस कमी झाल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना आलेला पूर ओसरत असल्याचे चित्र आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलीत सर्व दरवाजे आज बंद झाले यामुळे पॉवर हाऊसमधून फक्त १ हजार ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. या भागातील धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळी काल एका दिवसात २ फुटांनी उतरली आहे.

शनिवारी मध्यरात्री अकरा वाजता ४० फुटांवर स्थिर झालेली कृष्णा नदीची पातळी काल सकाळी आठ वाजता उतरायला सुरुवात झाली. रात्री आठपर्यंत सात इंच पाणी उतरले होते. आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी ३९.५ फूट इतकी होती. नदीला संथ उतार आहे. आलमट्टीत पाणीसाठा वाढवला जातोय आणि कोयना धरणातून विसर्ग कायम आहे, त्यामुळे या गतीनेच पाणी उतरत राहील, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी ४० फुटांभोवती फिरत आहे. ३६ फुटांपर्यंत खाली उतरलेली पातळी पुन्हा एकदा ४० फुटांवर गेली आणि नदीकाठी धास्ती निर्माण झाली होती. आज पुन्हा पाणी उतरू लागले आणि पूर अंगणातून परतू लागल्याची भावना सांगलीकरांनी व्यक्त केली. मात्र, पाणी लवकर हटत नसल्याने घरांचे मोठे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जी कच्ची घरे आहेत, त्यांचे मोठे नुकसान होईल, अशी शक्यता आहे.

पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

कोल्हापूरच्या राजाराम बंधाऱ्यावरील ४०.५ फुटांवर पाणी पातळी आली आहे तर अद्यापही ६३ बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदी पात्रातून सध्या ६० क्युसेकने विसर्ग होत आहे. कोयना धरणातून विसर्ग ५२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे तर धरणातील पाणीसाठा ८६.६३ टीएमसी इतका आहे. आलमट्टी धरणसाठा ७३ टीएमसी आहे तर धरणातील आवक ३ लाख १३ हजार क्युसेक आणि विसर्ग २ लाख ५० हजार क्युसेक असा सुरू आहे.

Kolhapur Flood
Gokul Milk Kolhapur : 'ही तर गोकुळच्या अध्यक्षांची हुकूमशाही', गोकुळ अध्यक्ष व दूध संस्था पदाधिकाऱ्यांत हमरीतुमरी

आलमट्टीचा विसर्ग केला कमी

आलमट्टी जलाशयातील विसर्ग शुक्रवारी संध्याकाळी साडेसहा वाजता आणखी तब्बल ५० हजार क्युसेकने कमी करून २ लाख ५० हजार क्युसेक ठेवला आहे. विशेष म्हणजे धरणात आवक अद्यापही ३ लाखांवर आहे. त्यामुळे पूर ओसरणेची गती कमी होणार आहे.

गेल्या चार दिवसांपूर्वी पावसाने उघडीप घेतली असतानाही नद्यांतून वाहून येणारे पाणी वाढतच गेले आहे. तरीही आलमट्टीतून विसर्ग वाढीव ठेवण्यात आला होता. आता पुन्हा महाराष्ट्रात पाऊस पडत असल्याने पाणी अधिक येण्याची शक्यता आहे. तरीही आलमट्टीतून टप्‍प्याटप्‍प्याने कमी करण्यात आला आहे. गुरुवारी साडेतीन लाखांवरून तीन लाख क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. आता शनिवारी पुन्हा कमी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com