Solar Pump Issues: सोलर पंपाच्या सक्तीने सिंचन अडचणीत

Irrigation Problems: शासनाने सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात विहिरी, शेततळे दिले. त्यातून सिंचन करण्याकरिता आतापर्यंत विजेवर चालणारे कृषिपंप होते.
Solar Pump Issues
Solar Pump IssuesAgrowon
Published on
Updated on

Vardha News: शासनाने सिंचन क्षेत्र वाढविण्याकरिता शेतकऱ्यांना विविध योजनांतून मोठ्या प्रमाणात विहिरी, शेततळे दिले. त्यातून सिंचन करण्याकरिता आतापर्यंत विजेवर चालणारे कृषिपंप होते. परंतु, शासनाने आता शेतकऱ्यांना विजेवर चालणारे कृषीिपंप देण्यास नकार देत सिंचनाकरिता सोलरपंप वापरण्याची सक्ती केली आहे. शासनाचे हे धोरण पर्यावरणपूरक असले तरी शेतकऱ्यांकरिता ते अडचणीचे ठरत आहे. 

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ऊर्जाबचत आणि पर्यावरणपूरक धोरणांतर्गत सोलर कृषिपंप योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत सोलर पंपाची करण्यात आलेली सक्ती शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारी ठरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परंपरागत वीज पंपांना पाण्याचा जेवढा फोर्स असतो, तो सोलर पंपांना मिळत नाही. यामुळे बागायतदार आणि पाण्याची अधिक गरज असलेल्या पिकांसाठी सोलर पंप कार्यक्षम ठरत नसल्याचे अनेक शेतकरी संगत आहेत. 

Solar Pump Issues
Solar Agri Pump: कृषिपंपांचे सौर ऊर्जाकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार

शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील काही भागांत सोलर पंपाचे पाणी सकाळी १० ते दुपारी तीन या मर्यादित वेळेतच मिळते. यानंतर वातावरण बदलत असल्याने सोलर कृषीपंप पंप पूर्ण क्षमतेने चालत नाहीत. त्यामुळे शासनाचा निर्णय शेतकऱ्यांकरिता धोक्याचा व अडचणीचा ठरणारा आहे.

Solar Pump Issues
Agriculture Solar Pump: मोठ्या पाणी योजनांना दहा एचपीचे सौरपंप देणार : मुख्यमंत्री

सिंचनाची व्यवस्था करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेण्याकरिता अडचणी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय मागे घेत शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार परंपरागत वीज कृषिपंपांना जोडणी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

अर्ज २०२१ पासूनचे प्रलंबित 

सिंचनाची सोय असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंपाकरिता आवश्यक रक्कम भरून अर्ज केले आहेत. मात्र, शासनाने वर्ष २०२१ पासून शेतकऱ्यांना वीज जोडणी दिली नाही. त्याचा परिणाम शेतकऱ्यांकडे व्यवस्था असताना गत पाच वर्षांपासून तो सिंचन करू शकला नाही. यात त्याचे मोठे नुकसान झाले. एकट्या वर्धा जिल्ह्यात १,१९० शेतकऱ्यांच्या विहिरी कृषिपंपांच्या प्रतीक्षेत आहेत. 

डिमांडची रक्कम परत 

शेतकऱ्यांनी पारंपरिक कृषिपंपासाठी विद्युत वितरण कंपनीकडे डिमांड भरून रक्कम जमा केली होती. आता शासनाच्या आदेशानुसार त्यांना सोलर पंपच देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी भरलेली रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी योजनेच्या सक्तीमुळे नाराजी कायम आहे. 

ऊर्जा बचतीसाठी आणि वीज भार कमी करण्यासाठी शासन सोलर पंपाला प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांसाठी ते अडचणीची ठरणार आहे. जमिनीत पाणी खोलवर असल्यास किंवा मोठ्या भूभागावर सिंचन करावयाचे असल्यास सोलर पंप उपयोगी ठरत नाहीत. त्यामुळे सोलर पंप हे पर्यायी साधन असावे, शासनाने शेतकऱ्यांना निवडीचा पर्याय द्यावा, सक्ती करू नये. 
- अविनाश काकडे, मुख्य प्रेरक, किसान अधिकार अभियान, वर्धा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com