Maharashtra Hiwali Adhiveshan : राज्य सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष; विरोधी पक्षनेते वड्डेटीवारांची टीका

Nagpur Assembly Session 2023 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (ता.७) विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarAgrowon
Published on
Updated on

Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (ता.७) विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली.

वड्डेटीवार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या द्राक्ष, संत्रा, कापूस, कांदा पिकांचं अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु शेतकऱ्यांकडे राज्य सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांना पक्षाचा प्रचार करणे महत्वाचे वाटते," असा टोलाही वड्डेटीवार यांनी लगवला.

पुढे ते म्हणाले, "एक हजार मंडळात दुष्काळ जाहीर केला. पण त्यासाठी केंद्राची मदत नाही. टंचाई सदृश्य परिस्थिती असा शब्दप्रयोग करून त्यामध्ये आठ उपयोजनांचा उल्लेख केला. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. सरकारने हात वर केले आहेत.

सरसकट मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. चक्रीवादाळाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. त्यामुळे आता त्यावर चर्चा झाली पाहिजे," अशी मागणी वड्डेटीवारांनी केली. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकार शेतकऱ्यांची पाठीशी उभे असल्याचे सांगितले.

राज्य सरकारची बाजू सांभाळत फडणवीसांनी वड्डेटीवार यांच्यावर पलटवार केला. फडणवीस म्हणाले, "विरोधीपक्ष नेत्यांनी संपूर्ण माहिती घेतलेली नाही. केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे ४० तालुके दुष्काळी घोषित झाले आहेत. जे निकषात बसत नाहीत, पण नुकसान झाले आहे.

तिथे राज्य सरकारने मदत देण्याचे जाहीर केलेले आहे. १ हजार २०० मंडळ दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. त्यांना जे मिळेल, तेच दुष्काळ सदृश्य मंडळांना मिळेल. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे." असे फडणवणीस म्हणाले.

Vijay Wadettiwar
India Politics : मोदीविरोधी मोहिमेतील वजाबाकीचे राजकारण!

दरम्यान, राज्य सरकारने गेल्यावर्षी १० हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली. पण शेतकऱ्यांना मात्र मदत मिळाली नाही, असे शेतकरी सांगत आहेत. यंदा राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ आणि अतिवृष्टीचा फटका बसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com