MGNREGA : जत तालुक्यात रोजगार हमी योजनेतून विकास प्रकल्प राबवणार

Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जतच्या विकासासाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे करण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आवश्यक सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही रोहयो तथा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली.
Rural Development
MGNREGAAgrowon
Published on
Updated on

Sangli News : ‘‘जिल्ह्यातील शेवटचा मतदार संघ असलेला जत कायम दुर्लक्षित राहिला आहे. शिवाय, राज्यकर्त्यांनी पाण्याचे आश्वासन देऊन हा भाग विकासापासून वंचित ठेवला. मात्र, रोजगार हमी योजनेमध्ये २६६ कामांचा समावेश आहे.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जतच्या विकासासाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त प्रोत्साहनपर कामे करण्यासाठी तसेच बांबू लागवडीसाठी आवश्यक सर्व सहकार्य करू, अशी ग्वाही रोहयो तथा फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

जत येथे पहिल्या रोजगार हमी पायलट प्रकल्पाच्या प्रारंभप्रसंगी गुरुवारी (ता. १३) मंत्री गोगावले बोलत होते. या वेळी ‘रोहयो’चे प्रकल्प संचालक नंदकुमार, जिल्हाधिकारी अशोक काकडे, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासह राजेंद्र शहाळे, अजयकुमार नष्टे, डॉ. रवींद्र आरळी, ब्रह्मानंद पडळकर, कृषी अधीक्षक विवेक कुंभार उपस्थित होते.

Rural Development
MGNREGA : सातारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत अनागोंदी

मंत्री गोगावले म्हणाले, ‘‘जतचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या तालुक्याला ‘रोहयो’तून लखपती बनवण्यास खूप स्पेस आहे. इथे एक पायलट प्रोजेक्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याचा प्रारंभही आपल्या सर्वांच्या साक्षीने करतो आहोत.

Rural Development
MGNREGA Horticulture Cultivation: ‘रोहयो’च्या पाठबळाने ४०,८०० हेक्टरवर फळबाग लागवड, शेतकऱ्यांना नवा दिलासा!

राज्यात मागे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना तालुक्याच्या सिंचनासाठी दोन हजार कोटी रुपये दिले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन हजार एकराची एमआयडीसी मंजूर केली आहे. आज आपण रोहयोचा राज्यातील पहिला पायलट प्रोजेक्ट करत आहोत. त्यामुळे आता जतच्या विकासात राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही.’’

राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार गोपीचंद पडळकर, महासंचालक नंदकुमार वाघमारे, आमदार सदाभाऊ खोत यांनी मनोगत व्यक्त केले. आनंदा लोकरे यांनी प्रास्ताविक केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com