Indrayani Bridge Tragedy: इंद्रायणी पूल दुर्घटनेत सरकारच्या हलगर्जीपणाचे बळी

Maharashtra Government Negligence: इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेली दुर्घटना ही केवळ निसर्गाची नाही तर सरकारच्या निष्काळजी धोरणाची परिणती आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
Harshavardhan Sapkal
Harshavardhan SapkalAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेले मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहीत असताना तो धोकादायक पूल खुला का ठेवला, असा सवाल करत सरकारने घेतलेले हे बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

इंद्रायणी पूल दुर्घटनेवर बोलताना श्री. सपकाळ म्हणाले, ‘‘कुंडमळा येथील लोखंडी पूल कमकुवत झाला होता, त्याच्यासाठी वर्षभरापूर्वी निधीही मंजूर केल्याचे सरकार सांगत आहे. मग वर्षभर काम का झाले नाही, सरकार दुर्घटना होण्याची वाट पहात बसले होते का, त्या पुलावर ‘पाटी’ लावली होती असे प्रशासन सांगत आहे,

Harshavardhan Sapkal
Rural Politics: खेड्यांमधील बदलते राजकारण

पण अशा पाट्या लावून ‘पाट्या’ टाकण्याचेच काम शासन व प्रशासन करत आहे. ५५ पर्यटक वाहून गेले, त्यातील अनेकांना वाचविण्यात आले, पण चार जण ठार झाले तर सहा गंभीर जखमी झाले, याला जबाबदार कोण, मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले म्हणजे सरकारची जबाबदारी संपत नाही. जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणीही गांभीर्याने घेणार नाही व अशा दुर्घटना होऊन निष्पाप लोक मात्र मरत राहतील.

पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा आहे. दुर्घटना होतात, लोक मरतात आणि सरकार काही पैसे तोंडावर फेकून ‘ये रे माझ्या मागल्या’ सारखे पुन्हा तेच होत राहाते, हे दुष्टचक्र थांबले पाहिजे,’’ असेही सपकाळ म्हणाले.

Harshavardhan Sapkal
Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीच्या चर्चेला वेग

‘शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात पुन्हा भ्रष्टाचार’

‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या चबुतऱ्याला मोठे भगदाड पडले आहे. निकृष्ट बांधकामामुळेच हे भगदाड पडले आहे. ११ मे रोजी या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. अवघ्या महिनाभरातच भगदाड पडत असेल तर त्या बांधकामाचा दर्जा काय असेल, हे यावरून दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबर २०२४ मध्ये महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्यानेच तो पुतळा ८ महिन्यांतच पडला होता. राज्यभरातील जनतेने प्रचंड संताप व्यक्त केल्यानंतर हा नवा पुतळा उभारला होता. पण या कामातही भ्रष्टाचार झाल्याने पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडले आहे. महाभ्रष्ट महायुतीने महापुरुषांच्या पुतळ्यालाही भ्रष्टाचाराची कीड लावली आहे असेच यावरून स्पष्ट होते,’’ अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com