Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीच्या चर्चेला वेग

Maharashtra Election: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमधील युतीच्या हालचालींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील चर्चांमुळे राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Raj Thackeray and Uddhav Thackeray
Raj Thackeray and Uddhav ThackerayAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची चर्चा पुढे सरकली असून लवकरच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘लवकरच महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल,’ असे सांगून उत्सुकता ताणवली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत गळती लागली. इतकेच नव्हे तर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्हही उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या हवाली केले. त्यानंतरही ठाकरे गटातील गळती थांबली नव्हती. राज ठाकरे यांनी अनेक भूमिका बदलत अपयश पदरी पाडून घेतल्याने पक्ष क्षीण झाला आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Maharashtra Politics: ओसाडगावच्या पाटिलकीतील आखाडे

विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर मनसेची आमदार संख्या शून्यावर आली. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

मात्र, याआधी एकदा युतीची चर्चा झाली आणि उद्धव यांनी आपल्याला फसवल्याचे खुलेआम आरोप केला होता. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या पातळीवर वाटाघाटी सुरू असून येत्या काही दिवसांत युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray
Political Strategy: कूटनीती आणि ‘फूट’नीती

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असे म्हणत युतीचे संकेत दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असून नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा करायची आणि जागावाटपाची चर्चा करून युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

दोन्ही ठाकरेंसमोर आव्हान

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत गळती लागली. अनेक निष्ठावंतांनी ठाकरे यांची साथ सोडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. तर राज यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या १३ वरून घसरत १ आणि सध्या शून्य आहे.

महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनी मध्येच साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे हा पक्ष सध्या विस्कळीत आहे. राज यांची गर्दी खेचण्याची कला आणि उद्धव यांची कार्यपद्धती असा संगम होऊन नवी समीकरणे उदयाला येतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com