Livestock Census : पशुगणनेसाठी प्रगणकांची संख्या तोकडीच

Animal Care : राज्यात पशुगणनेसाठी गावांची आणि प्रभागाच्या संख्येच्या तुलनेत प्रगणकांची संख्या तोकडीच असल्याने आतापर्यंत केवळ ४० टक्के ऑनलाइन पशुगणना पूर्ण झाली आहे.
Khilar Cow
livestock CensusAgrowon
Published on
Updated on

Sangli News : राज्यात पशुगणनेसाठी गावांची आणि प्रभागाच्या संख्येच्या तुलनेत प्रगणकांची संख्या तोकडीच असल्याने आतापर्यंत केवळ ४० टक्के ऑनलाइन पशुगणना पूर्ण झाली आहे. पशुगणना करण्यासाठी प्रगणकांवर ताण येत असल्याने गणना करण्यास विलंब होत असल्याचे चित्र आहे.

दर पाच वर्षांनी होणारी पशुगणना नोव्हेंबरपासून सुरू झाली. यंदाची २१ वी पशुगणना पहिल्यांदाच मोबाइल ॲपद्वारे होत आहे. राज्यातील ४४ हजार ४७० गावे आणि ७ हजार ९२२ प्रभाग असे एकूण ५२ हजार ३९२ ठिकाणी एकविसावी पशुगणना सुरू आहे. त्यासाठी पशुगणनेसाठी ७ हजार ७४९ प्रगणक आणि १ हजार ४२४ पर्यवेक्षक यांची नेमणूक केली आहे.

सद्यःस्थितीला ६ हजार ४३ प्रगणकांनी गणना सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत १७ हजार ९७८ गावे आणि २ हजार ९५४ प्रभागात पशुगणना पूर्ण झाली आहे. त्यापैकी २ हजार ५८४ गावे आणि प्रभागातील पशुगणना ऑनलाइन पद्धतीने पूर्ण झाली आहे.

Khilar Cow
Livestock Census : नेटवर्क अडथळ्यांमुळे दुर्गम भागांत पशुगणनेचा वेग मंदावला

पशुगणनेसाठी ग्रामीण भागात प्रति तीन हजार कुटुंबाला एक प्रगणक तर शहरी भागासाठी प्रति चार हजार कुटुंबाला एक प्रगणक अशी निवड केली आहे. त्यानुसार प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील ४४ हजार ४७० गावे आणि ७ हजार ९२२ प्रभागात एकाच वेळी गणना सुरू आहे. मात्र, गाव आणि प्रभागांच्या संख्येच्या तुलनेत प्रगणकांची संख्या तोकडी आहे. परिणामी प्रगणकांवर ताण येत असून प्रगणकांना गणना करण्यास विलंब होत आहे.

पशुगणना एकाच वेळी सुरू आहे. त्यामुळे पशुगणना पूर्ण होईल, तशी माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण होणार आहे. पशू गणना सुरू होऊन दोन महिन्यांचा काळ लोटला आहे. मात्र, २४ हजार ६८ गावे आणि ४ हजार ८१९ प्रभात असे एकूण २८ हजार ८८७ भागात पशुगणना अद्यापही सुरू झाली नाही. त्यामुळे गणना दिलेल्या वेळेत पूर्ण होणार का? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

एकच काम दोनवेळा

दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी पशुगणना सुरळीत सुरू आहे. दुर्गम भागात मोबाइल नेटवर्क नसल्याने नोंद करण्यासाठी प्रगणकांना अडचणी येत आहे. त्यामुळे प्रगणक ऑफलाइन पद्धतीने पशुगणना करत आहेत. तर अनेक भागातील प्रगणक पशुगणनेची माहिती कागदांवर लिहून घेतात आणि ते कार्यालयात आल्यावर पुन्हा भरतात. त्यामुळे एकच काम दोनवेळा करण्याची वेळ प्रगणकांवर आली आहे.

Khilar Cow
Livestock Census : सिंधुदुर्गातील १५६ गावांतील पशुगणनेचे काम पूर्ण

मुदत वाढ मिळणार का?

महाराष्ट्र वगळता इतर राज्यात २५ ऑक्टोबर पासून पशुगनणा सुरू झाली. या राज्यांना मार्चअखेर गणना पूर्ण करण्याची मुदत आहे. राज्यात आचारसंहिता असल्याने एक महिना पशुगणना पुढे गेली. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून पशुगणना सुरू झाली असून फेब्रुवारी अखेर गणना पूर्ण करण्याची अंतिम मदत आहे. परंतु फेब्रुवारी अखेर पशूगणना पूर्ण होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे केंद्राकडून गणनेस मुदत वाढ मिळणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.

विलंब लागण्याचा ‘पशुसंवर्धन’चा दुजोरा

केंद्राने देलेल्या निकषाप्रमाणे प्रगणकांची निवड केली असून त्यांना प्रशिक्षण दिले आहे. एका प्रगणकाने दररोज ३० ते ३५ कुटुंबातील पशुगणना करायची आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

प्रगणकांना प्रशिक्षण जरी दिले असले तरी, त्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच गावे आणि प्रभागाच्या संख्येच्या तुलनेत प्रगणकांची संख्या कमीच आहे. परिणामी गणना करण्यास विलंब होणास असल्याचा दुजोरा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com