Livestock Census : बारामती तालुक्यात पशुगणना सुरू

Census Update : बारामती तालुक्यात पशुगणना सुरू झाली असून, यासाठी ग्रामीणमध्ये २७ प्रगणक, शहरमध्ये ८ व ६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत.
Livestock Census
Livestock CensusAgrowon
Published on
Updated on

Baramati News : बारामती तालुक्यात पशुगणना सुरू झाली असून, यासाठी ग्रामीणमध्ये २७ प्रगणक, शहरमध्ये ८ व ६ पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत, अशी माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. डी. आर. पोळ यांनी दिली. प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर पशुगणनेला प्रारंभ झाला आहे.

पशुगणनेच्या माध्यमातून नागरी व ग्रामीण भागातील १६ प्रजाती : गायवर्गीय, म्हसवर्गीय पशुंसह, मेंढी, शेळी, डुक्कर, घोडा, खेचर, गाढव, कुत्रा, ससा, हत्ती, कुक्कुट पक्षी ः कोंबडे, कोंबड्या, बदक, टर्की, क्वेल यांची जातीनिहाय, वयोगट तसेच लिंगनिहाय व उपयोगानुसार आकडेवारी गोळा केली जाणार आहे.

Livestock Census
Livestock Census : जव्हार तालुक्यात पशुगणनेला सुरुवात

त्याचबरोबर भटकी कुत्री, भटक्या गाई आणि प्रथमच भटका पशुपालक समुदाय पैस्टोरल कम्युनिटी, गोशाळा, पांजारपोळातील गोवंशाची देखील माहिती संकलित करण्यात येणार आहे. ही पशुगणना फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Livestock Census
Livestock Census : प्रगणकाला पशुधनाची योग्य माहिती देण्याचे आवाहन

पशुगणनेत पशुधनाच्या ओळखीसाठी विशिष्ट सांकेतिक क्रमांक असलेला बिल्ला (टॅगिंग) मारणे बंधनकारक केले असून पशुगणनेच्या माध्यमातून तालुक्यातील पशुधनाची अचूक आकडेवारी उपलब्ध होणार आहे. यासाठी पशुपालकांनी प्रगणकांना अचूक व संपूर्ण माहिती देऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले.

शासनाला नियोजनासाठी पायाभूत सांख्यिकी माहितीची अत्यंत आवश्यकता असते. अशी पायाभूत माहिती ही गणनेच्या स्वरूपात गोळा केली जाते. पशुसंवर्धन क्षेत्रात अधिक सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टिने २० व्या पशुगणनेत जातनिहाय प्रजातींचे वय, लिंग व उपयोगानुसार गणना करण्यात आली. २१ व्या गणनेत पशुधन प्रजातींची जात, वय आणि लिंग व उपयोगानुसार माहिती गोळा केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com