Shubhanshu Shukla: शुंभाशू शुक्ला अंतराळ मोहिमेसाठी रवाना; अंतराळात मूग आणि मेथीवर संशोधन

ISRO NASA Mission : नासा आणि इस्त्रोच्या या संयुक्त मोहिमेत अंतराळात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी रवाने झालेली शंभाशू १४ दिवस अंतराळात राहणार आहेत.
Shubhanshu Shukla
Shubhanshu ShuklaAgrowon
Published on
Updated on

Axiom Mission 4 (Space Agriculture): भारतीय अंतराळवीर शुंभाशू शुक्ला बुधवारी (ता.२५) दुपारी १२: ०१ वाजता अॅक्सियम मिशन ४ अंतर्गत अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. या मोहिमेत अंतराळातील पिकांच्या उगवणीसाठी महत्त्वाचं संशोधन करण्यात येणार आहे. त्यामुळे भारत केंद्रित अंतराळ शेती आणि भविष्यातील अंतराळ संशोधनाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या मोहिमेसाठी ५४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नासा आणि इस्त्रोच्या या संयुक्त मोहिमेत अंतराळात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी रवाने झालेली शंभाशू १४ दिवस अंतराळात राहणार आहेत. या १४ दिवसांमध्ये ७ प्रयोग करणार आहेत. तसेच बहुतेक जैविक अभ्यास असून अंतराळातील मानवी आरोग्य आणि जीवांवर होणारा परिणाम याचा अभ्यास केला जाणार आहे.

Shubhanshu Shukla
Agriculture Research: प्रखर उन्हात तग धरणारी तुरीची जात विकसित

पृथ्वीवरून अंतराळात अन्न पाठवणे खर्चीक आणि कठीण काम असते. त्यामुळे अंतराळात अन्न निर्मितीसाठी या मोहिमेत प्रयोग केले जाणार आहेत. यामध्ये मूग व मेथी पिकांवर अभ्यास करण्यात येणार आहे. या पिकांवर अंकुरणाचे प्रयोग, टार्डिग्रेड, सूक्ष्मजीव, मायोमस्क्युलर पुनर्रचना, आणि मायक्रोअल्गींचा अभ्यास करण्यात येईल.

अंतराळात ताजे अन्न तयार करणं, त्यासाठी पिकाच्या उगवणं क्षमतेवर प्रयोग केले जातील. भारतीयांच्या स्वयंपाक घरात मूग आणि मेथी महत्वाची पिकं मानली जातात. त्यामुळे या दोन्ही पिकातील पौष्टिकता आणि औषधी गुणधर्म लक्षात घेऊन या दोन पिकांची अंतराळात संशोधनासाठी निवड करण्यात आली आहे. अंतराळात या दोन्ही पिकांवर निरीक्षण केले जाणार आहे.

शेतीचे प्रयोग कोणते? (Space farming)

केरळ कृषी विद्यापीठासह भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सहा प्रकारच्या पिकांच्या बियाण्यांची चाचणी घेणार आहे. तसेच पृथ्वीवर परतल्यानंतर त्याच्या अनुवंशिकतेतील बदलांचं निरीक्षण करून भविष्यातील अंतराळ शेतीसाठी सर्वात योग्य गुणधर्म निवडण्यासाठी या बियाण्यांची लागवड करण्यात येणार आहे. या संशोधनामुळे भविष्यात मंगळ आणि चंद्र मोहिमेवर अन्न निर्मितीसाठी क्रांती घडेल, असं तज्ज्ञ सांगतात.

Shubhanshu Shukla
Farmer Fraud: शेतकऱ्यांची १४५ कोटींनी फसवणूक करणाऱ्याचा जामीन फेटाळला

कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाड आणि आयआयटी धारवाड यांच्यासोबतचा दूसरा प्रयोग हा बियाण्यांच्या उगवणीवर करण्यात येणार आहे. यामध्ये बियाण्यांपासून कापणीपर्यंत या वनस्पतीवर जागेचा कसा परिणाम होतो, त्यासाठी वाढीचा दर, पौष्टिक मूल्य आणि सूक्ष्मजीव भार याचं निरीक्षण केलं जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com