Agriculture Research: प्रखर उन्हात तग धरणारी तुरीची जात विकसित

Tur New Variety Developed: आंतरराष्ट्रीय कोरडवाहू पीक संशोधन संस्था, अर्थात इक्रिसॅटने उन्हाळ्यात अगदी ४५ अंश सेल्सियस तापमानात तग धरून राहणारी आणि केवळ १२५ दिवसांत पक्व होणारी तुरीची जात विकसित केली आहे.
Tur
Tur Agrowon
Published on
Updated on

Hyderabad News: आंतरराष्ट्रीय कोरडवाहू पीक संशोधन संस्था, अर्थात इक्रिसॅटने उन्हाळ्यात अगदी ४५ अंश सेल्सियस तापमानात तग धरून राहणारी आणि केवळ १२५ दिवसांत पक्व होणारी तुरीची जात विकसित केली आहे. जलदगती पैदास तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली ही जगातील पहिली जात असल्याचा दावा इक्रिसॅटने केला आहे.

इक्रिसॅटच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या तुरीच्या नव्या जातीचे नाव आयसीपीव्ही २५४४४ आहे. या संशोधनामुळे तूर आता केवळ खरीप हंगामामध्येच नव्हे, तर अन्य हंगामांत घेणे देखील भारतीय शेतकऱ्यांना शक्य होणार आहे. सध्या या वाणाच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. कर्नाटक, ओडिशा आणि तेलंगणा या राज्यांमध्ये या वाणाच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामध्ये हेक्टरी २० क्विंटल उत्पादन मिळाले.

Tur
Tur Market Price: शुल्कमुक्‍त वाटाणा आयातीमुळे तूर दबावात

देशातील कडधान्य क्षेत्रासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. इक्रिसॅटच्या शास्त्रज्ञांनी तूर खरिपाव्यतिरिक्त इतर हंगामातही घेणे शक्य असल्याचे दाखवत डाळींचा तुटवडा आणि हवामान बदल या दोन महत्त्वाच्या बाबींवर उत्तर शोधले आहे, असे प्रतिपादन इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक यांनी केले.

ही जात विकसित करताना जलद गतीच्या पैदास तंत्रज्ञानाचा (स्पीड ब्रीडिंग प्रोटोकॉल) वापर जगात प्रथमत झाल्याचा दावा इक्रिसॅटने केला आहे. या तंत्रज्ञानामध्ये तुरीच्या वर्षाला चार पिढ्या वाढवणे शक्य झाले. त्यामुळे नवी जात विकसित करण्याचा पारंपरिक पद्धतीत लागणारा सुमारे १५ वर्षांचा काळ केवळ पाच वर्षांपर्यंत येऊन ठेपला, असे इक्रिसॅटचे उपमहासंचालक डॉ. स्टॅनफोर्ड ब्लेड यांनी सांगितले.

Tur
MSP Tur Procurement : हमीभावाने ४० हजार ९०१ क्विंटल तूर खरेदी

आयात कमी होण्यास मदत?

भारतात सध्या दरवर्षी सुमारे ३५ लाख टन तुरीचे उत्पादन होते. मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन अपुरे पडते. त्यामुळे साधारण १५ लाख टन तुरीचा तुटवडा जाणवतो. ही गरज पूर्ण करण्यासाठी दरवर्षी साधारण ८०० दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किमतीच्या तुरीची आयात भारताला करावी लागते. इक्रिसॅटच्या या संशोधनामुळे तुरीचे उत्पादन वाढून देशांतर्गत तुटवडा कमी होण्यास मदत मिळेल, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

ठळक वैशिष्ट्ये

४५ अंश सेल्सिअस तापमानाला तग धरून राहणे शक्य.

कमी कालावधीचे वाण.

केवळ १२५ दिवसांत पक्व होणारे वाण.

हेक्टरी २० क्विंटल उत्पादन.

उन्हाळी हंगामातही लागवड शक्य.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com