Dairy development : भारत दुग्धजन्य उत्पादनात एक नंबर: कृषिमंत्री चौहान

Dairy sector : देशातील दुग्धजन्य पदार्थांची जगभर चर्चा होत आहे. जगभरातील प्रत्येक घरात भारतीय दुग्धजन्य पदार्थ पोहचले आहेत. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था दुग्ध क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेऊन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असं प्रतिपादन चौहान यांनी केलं.
Agriculture minister
Agriculture minister Agrowon
Published on
Updated on

Milk production : दुग्धजन्य पदार्थ उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला. कर्नाल येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेच्या दीक्षांत समारंभात कृषिमंत्री चौहान मंगळवारी (ता.२२) बोलत होते. यावेळी देशातील दुग्ध क्षेत्राचा विकास करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन चौहान यांनी केलं.

चौहान म्हणाले, "देशातील दुग्धजन्य पदार्थांची जगभर चर्चा होत आहे. जगभरातील प्रत्येक घरात भारतीय दुग्धजन्य पदार्थ पोहचले आहेत. राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था दुग्ध क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेऊन महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे." असं प्रतिपादन चौहान यांनी केलं.

यावेळी चौहान यांनी राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेला एका गाव निवडणून प्रयोग करण्याचं आवाहन केलं. तसेच लखपती दीदी योजनेतून ३ कोटी महिलांना सक्षम करण्याचा पुनरुच्चार केला. प्रत्येक गाव गरीबीमुक्त करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आल्याचं चौहान म्हणाले.

Agriculture minister
Dairy Farming: अवशेषमुक्त दूध उत्पादनासाठी जागरूक व्हा

ब्राझीलचा अनुभव

ब्राझील येथील १५ ब्रिक्स परिषदेतून कृषिमंत्री चौहान सोमवारी परतले. त्यांनी ब्राझीलचा अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. ब्राझीलमध्ये शेती पाहिली. तिथं पाणी कसं देतात, पिकांची काढणी कशी करतात, याचं मी बारकाईनं निरीक्षण केल्याचं चौहान म्हणाले.

पंतप्रधान मोदींचं कौतुक

विद्यार्थ्यांना संबोधित करताना चौहान यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. पंतप्रधान मोदींचं विकसित भारताचं स्वप्न आहे. एक वैभवसंपन्न, गौरवसंपन्न, समृद्ध आणि शक्तिवान देश निर्माण करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं लागेल, असंही चौहान म्हणाले.

दरम्यान, देशातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी किफायतशीर दर मिळत नाही. दुग्ध प्रक्रिया उद्योगाचा विस्तार झालेला नाही. एकूण उत्पादनाचा तुलनेत दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचं प्रमाण कमी आहे. देशातून केवळ दूध भुकटीची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते, असं जाणकार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com