Chia Farming : शेतकऱ्यांचा चिया पीक उत्पादनाकडे कल

Chia Production : आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांचे चिया पिकाच्या उत्पादनाकडे कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
Chia Farming
Chia FarmingAgrowon

Pune News : आळेफाटा परिसरातील शेतकऱ्यांचे चिया पिकाच्या उत्पादनाकडे कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अन्न पचनासंबंधीच्या आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये या पिकाला मागणी वाढत असल्याने चिया शेती करण्याकडे शेतकरी आकर्षित होऊ लागले आहेत.

या पिकात शरीरातील स्नायूंची वाढ होऊन कर्करोग व हृदय विकारांचा धोका कमी असतो, अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने यांस परदेशात मोठी मागणी असून हे औषधी वनस्पतींचे पीक अमेरिकेत जास्त प्रमाणात घेतले जाते.

Chia Farming
Chia Seeds : चिया (सबज्या) सीड या गोष्टीवर प्रभावी ठरेल!

चिया या औषधी वनस्पतीचे पीक सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील जाधववाडी येथील लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याने पिकवले होते. जाधव यांनी वेळोवेळी औषध फवारणी, खते वापरून तसेच या पिकाचा अभ्यास करून पहिल्यांदाच ५०० किलो चियाचे उत्पादन घेतले होते. यामधून त्यांना दोन लाख रुपयांचा नफा झाला होता.

हे पीक करीत असताना इतर शेतकऱ्यांनीही हे पीक करावे यासाठी ते मार्गदर्शन करीत आहेत. बोरी बुद्रुक, जाधववाडी या गावांमध्ये काशिनाथ जाधव, तानाजी जाधव, रामदास जाधव याशिवाय पाच ते सहा शेतकऱ्यांनी हे पीक घेतले आहे.

Chia Farming
Geranium and Chia Farming : जिरॅनियम तेलनिर्मिती अन् चियाची शेती

चियासीड ही अमेरिकन औषधी वनस्पती असून पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच जाधववाडीतील लक्ष्मण जाधव यांनी घेतले होते. यामधून त्यांना चांगला फायदा झाला होता. चालू वर्षी बोरी, जाधववाडी या गावांमधील सात ते आठ शेतकऱ्यांनी घेतले असून या वनस्पतीला चांगल्या प्रकारे मागणी आहे. या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम बागायती काळीभोर जमीन लागते, पेरणी कांद्याच्या बियाणाप्रमाणे पेरणी करावी लागते. तसेच दोन ओळींतील अंतर चार फुटांचे असावे. पाणी ठिबक पद्धतीने किंवा ओळींतून सोडले तरी चालते.

- राजश्री नरवडे, कृषी अधिकारी

या पिकाची माहिती कृषी प्रदर्शनात मिळाल्यानंतर बियाणे घेण्यापासून त्याचे संगोपन, काढणी व विक्री कुठे होती, याबाबतची माहिती घेतली. या पिकाला एकरी फक्त १५ हजार रुपये खर्च येतो. औषधी वनस्पती असल्याने उद्योगांकडून शेतावरच खरेदी होते. या बियाणाला ५०० ते ६०० रुपये किलोप्रमाणे उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. मध्य प्रदेशात आपण स्वतः मार्केटमध्ये जाऊन विकले, तर एक हजार रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळत आहे

- लक्ष्मण जाधव, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com