Farmer Drought Relief : सोलापुरात दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रतीक्षाच

Farmer is Waiting for Help : ऑक्टोबरनंतर जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश झाला. या तालुक्यांत सुमारे ५ लाख १९ हजार ८४९ शेतकरी आहेत.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Solapur News : ऑक्टोबरनंतर जाहीर झालेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा समावेश झाला. या तालुक्यांत सुमारे ५ लाख १९ हजार ८४९ शेतकरी आहेत. पण आतापर्यंत केवळ ६० हजार शेतकऱ्यांच्याच याद्या अपलोड झाल्या असल्याने उर्वरित शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पाहावी लागेल, असे चित्र आहे.

Farmer Issue
Farmer Relief Fund : नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपयांना मंजुरी

यंदा पावसाळ्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला, त्यात खरीप पिकांचे नुकसान झाले. सध्या तर परिस्थिती फारच बिकट झाली आहे. जमिनीतील पाणीपातळी खालावली असून, पाण्याअभावी शेते ओस पडली आहेत. शासनाने दुष्काळी तालुक्यांमधील बाधित शेतकऱ्यांना मदत मंजूर केली. पण ज्या गतीने ती द्यायला हवी, ती गतीने अद्यापही ती मिळालेली नाही.

Farmer Issue
Farmer Relief Fund : नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी २९८ कोटींवर निधी वितरणास मंजुरी
दुष्काळी पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या याद्या मार्चअखेर अपलोड होतील, यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आदेश दिले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल, असे जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी दररोज आढावा घेतला जात आहे.
मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

जिल्ह्यातील पाच तालुक्यांची मदत

तालुका बाधित शेतकरी मदत (कोटींत)

बार्शी ४१,९६३ ३७.४७

माळशिरस १,२३,९८० १८३.११

सांगोला १,१९,३४२ १५७.०७

करमाळा १,०९,९१३ १४६.९४

माढा १,२४,६५१ १६४.३९

एकूण ५,१९,८४९ ६८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com