Farmer Relief Fund : नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी २९८ कोटींवर निधी वितरणास मंजुरी

Disbursement of Funds : दोन जिल्ह्यांसाठी एकूण २९८ कोटी ६७ लाख २४ हजार रुपये निधी वितरणास महसूल व वन विभागाने बुधवारी (ता. ३१) काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.
Agriculture Fund
Agriculture FundAgrowon

Parbhani News : २०२३ च्या नोव्हेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर (अवेळी) पावसामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील ४ लाख ८९ हजार ४१२ शेतकऱ्यांच्या २ लाख १८ हजार २१७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले.

बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी परभणी जिल्ह्याला १३० कोटी ८० लाख ५९ हजार रुपये व हिंगोली जिल्ह्याला १६७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये असे दोन जिल्ह्यांसाठी एकूण २९८ कोटी ६७ लाख २४ हजार रुपये निधी वितरणास महसूल व वन विभागाने बुधवारी (ता. ३१) काढलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी दिली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे परभणी जिल्ह्यातील ५८० गावांतील २ लाख ३१ हजार ७८७ शेतकऱ्यांच्या जिरायती, बागायती, फळपिके मिळून एकूण ९५ हजार ५३ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले आहे.

वाढीव दरानुसार जिरायती क्षेत्रातील ९४ हजार ३३८.४४ हेक्टर पीकनुकसानीबद्दल १२८ कोटी ३० लाख २ हजार ७८४ रुपये, बागायती क्षेत्रातील ७६ हेक्टर ९० पीक नुकसानीबद्दल २० लाख ७६ हजार ३०० रुपये, बहुवार्षिक ६३८ हेक्टर ३३ पीक नुकसानीबद्दल २ कोटी २९ लाख ७९ हजार ८८० रुपये असे एकूण १३० कोटी ८० लाख ५९ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

Agriculture Fund
Rain Damage Relief Fund : पाऊस नुकसानाची मदत पोहोचली ३३२ कोटी रुपयांवर

हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ५७ हजार ४८७ शेतकऱ्यांच्या १ लाख २३ हजार १६४ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात जिरायती क्षेत्रातील १ लाख २१ हजार ७१४ हेक्टरवरील पिके व १६२ हेक्टरवरील बहुवार्षिक पिकांचा समावेश आहे.

वाढीव दरानुसार जिरायती पिकांच्या नुकसानीबद्दल १६५ कोटी ५४ लाख ५१ हजार ८४० रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीबद्दल ५८ लाख ३२ हजार रुपये निधी अपेक्षित आहे.

Agriculture Fund
Farmer Relief Fund : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षा कायम

नोव्हेंबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पाऊस व पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपीकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्यासाठी वाढीव दरानुसार जिरायती पिकांच्या नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपये,

बागायती पीक नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी २७ हजार रुपये, बहुवार्षिक पीक नुकसानीबद्दल प्रतिहेक्टरी ३६ हजार रुपये मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे. मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळता करू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे निर्देश महसूल व वन विभागातर्फे देण्यात आले आहेत.

परभणी-हिंगोली जिल्हा मॉन्सूनोतर पाऊस

पीक नुकसान स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र

परभणी ६५ ३३०३० २१३११

जिंतूर १६९ ६०३७५ १९५६६

सेलू ३० १८५१० ५८१०

मानवत ५३ ३७७२५ ११६१५

पाथरी ३१ १०००४ ४१३४

सोनपेठ ५४ २८४६१ ७८०६

गंगाखेड ४२ ११२३ ७४२

पालम ४२ १२२६५ ५३००

पूर्णा ९४ ३०२९४ १८७६६

हिंगोली ५९८१३ २९९५६

कळमनुरी ५१२३७ २३३३५

वसमत २६६४४ १७२५८

औंढा नागनाथ ५७९४६ २३५३०

सेनगाव ६१४१९ २७६४५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com