Water Stock : सातपुड्यातील सिंचन प्रकल्प आटू लागले

Water Shortage : खानदेशात सातपुडा पर्वतातील व पर्वतालगतचे अनेक प्रकल्प आटू लागले आहेत. लघु प्रकल्प, तलाव कोरडे होत असून, सातपुड्यात टंचाई वाढत आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतातील व पर्वतालगतचे अनेक प्रकल्प आटू लागले आहेत. लघु प्रकल्प, तलाव कोरडे होत असून, सातपुड्यात टंचाई वाढत आहे. वन्यप्राण्यांसह आदिवासी पाड्यांवर टंचाईचा सामना करावा लागत आहे.

सातपुड्यात पाऊसमान बरे होते. रावेरात अतिवृष्टीचा प्रकारही सातपुड्यात झाला होता. जुलैतच रावेरातील सातपुड्यातील मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यात अभोडा, मंगरूळ, सुकी या मध्यम प्रकल्पांचा समावेश होता. तसेच यावलमधील गारबर्डी लघु प्रकल्प, मोर मध्यम प्रकल्प, निंबादेवी लघु प्रकल्प, चोपड्यातील गूळ प्रकल्प, चिंचपाणी, डुकरणे, चांदण्या तलाव आदी प्रकल्पांतही बऱ्यापैकी जलसाठा होता.

Water Stock
Water Stock : खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

धुळ्यातील अनेर व अन्य तलाव, नंदुरबारातील शहादा, तळोद्यातील सातपुड्यातील सर्व तलाव, लघु प्रकल्प १०० टक्के भरले होते. परंतु उष्णता व उपसा यामुळे या प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने कमी झाला आहे. चोपड्यातील डुकरणे, चिंचपाणी व चांदण्या तलावात मृतसाठा आहे. सातपुड्यातील चोपडा भागातील चिंचपणी प्रकल्पात मागील चार ते पाच वर्षे जलसाठा अल्प आहे. कारण या भागात पाऊसमान कमी होते.

प्रकल्पांत जलसाठा घटत असल्याने सातपुड्यातील जीवसृष्टीला फटका बसत आहे. अनेक वन्यप्राणी पाण्यासाठी गावोगावी, सपाटी भागावर येत आहेत. त्यात माकड, रानडुकरे, हरिण व अन्य प्राणी सपाटी भागात दाखल झाले आहेत. वन्यप्राण्यांच्या पाण्यासाठी काही भागात किंवा यावल अभयारण्य, कुऱ्हा वढोदा परिसरात कृत्रीम तलाव वन विभागाने तयार केले आहेत. परंतु ते अपुरे पडत आहेत.

Water Stock
Water Issue : पाण्यासाठी उसनवारी, ऊसपट्टा व्याकूळ

उष्णतेते ते लागलीच आटतात. त्यात २४ तास पाणी नसते. यामुळे वन्यप्राणी शेतशिवारात दाखल होत असून, पिकांची नासाडीदेखील होत आहे. सध्या यावल, रावेर, चोपडा, शिरपूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा या तालुक्यांत सातपुडालगत रानडुकरे, हरिण, गवे, निलगायी धूमाकूळ घालत आहेत.

केळी, ऊस, भाजीपाला पिकांची नासधूस करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेतात मुक्कामी थांबावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीची तयारी केली आहे. परंतु कापसाचे पीक हरिण व अन्य वन्यप्राणी फस्त करीत असल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. शेतात मुक्कामी थांबल्याशिवाय पर्याय नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कमाल प्रकल्पांत ५० टक्क्यांखाली साठा

सातपुड्यातील कमाल सिंचन प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा आहे. हा जलसाठा घटत असल्याने पुढे टंचाई वाढेल, असे दिसत आहे. पाऊसमान जेथे चांगले होते, तेथेही कृत्रीम टंचाई आहे. कारण पाणी साठवणीची व्यवस्था पुरेशी नाही. पाऊस आला व वाहून गेला, अशी स्थिती अनेक भागात आहे. याचाही फटका बसला आहे. आदिवासी पाड्यांत विंधन विहिरींची गरज अधिक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com