Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Water Crisis : वास्तविक बारामतीचा जिरायती पट्टा हा पावसाळ्याचे चार महिने सोडले तर इतर वेळी पाणी टंचाईमुळे कायम दुष्काळ सदृश असतो.
Water Scarcity
Water Scarcity Agrowon

Baramati News : तालुक्याच्या पश्‍चिम भागातील टंचाईग्रस्त आठ गावे व ७८ वाड्या लोणी भापकर प्रादेशिक योजनेमुळे कायमच्या टंचाईमुक्त होणार आहेत. या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. वास्तविक बारामतीचा जिरायती पट्टा हा पावसाळ्याचे चार महिने सोडले तर इतर वेळी पाणी टंचाईमुळे कायम दुष्काळ सदृश असतो.

२०२२ मध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत लोणी भापकर प्रादेशिक योजनेसाठी ५७.५८ कोटी रुपयांचा निधी लोणी भापकरसह आठ गावे व ७८ वाड्यांसाठी मंजूर झाला आहे. यामध्ये लोणी भापकर, सायंबाची वाडी, मासाळवाडी, मुढाळे, तरडोली, भिलारवाडी, पळशी, जळकेवाडी या ८ गावांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत १२१ दशलक्ष लिटर क्षमतेचा साठवण तलाव सस्तेवाडी येथे बांधण्यात आला आहे.

Water Scarcity
Water Scarcity : इंदापूर तालुक्यात टँकरची मागणी वाढली

नीरा कॅनॉलच्या पाण्याच्या उद्‍भवावर हा साठवण तलाव अवलंबून आहे. २०२२ मध्ये या योजनेचे काम सुरू करण्यात आले असून, सध्या काम अंतिम टप्प्यांमध्ये आहे. २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा कालावधी आहे. या साठवण तलावापासून अकरा किमी अंतरावर लोणी भापकर ग्रामपंचायतच्या अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.

या माध्यमातून आठ गावे व ७८ वाड्यांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. काही ठिकाणी जुन्या व सद्यःस्थितीमध्ये संकल्पित कालावधी न संपलेल्या व वापरास योग्य असलेल्या पाणीपुरवठा टाकी वापरण्यात येणार आहेत. तर गरज असलेल्या ठिकाणी नवीन पाणीपुरवठा टाकीची व्यवस्था केली जाणार आहे. या पाणीपुरवठा टाकीचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

Water Scarcity
Water Scarcity : पाण्याअभावी १६ धरणे कोरडी

तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना गावचा तलाव व इतर जलस्रोतांवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजना यावर या गावांना पाणीपुरवठा केला जात असे. उन्हाळ्यात मात्र जवळपास सलग चार महिने या गावांना टॅंकरनेद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र लोणी भापकर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे.

विशेष म्हणजे हे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी नागरिकांना मिळणार आहे. सस्तेवाडी येथे साठवण तलावापासून ते जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणाऱ्या पाइपलाइनचे काम एका शेतकऱ्यांने अडवल्यामुळे येथील काम रखडले आहे. मात्र समन्वय, सुसंवाद साधून व वेळ पडली तर नियम व कायदे वापरून येथील काम पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासकीय यंत्रणेकडून करण्यात आले आहेत.

८ गावे व ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

लोणी भापकर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून, काम अंतिम टप्प्यात आहे. या योजनेमुळे लोणी भापकरसह आठ गावे व ७८ वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे. अशी माहिती जलजीवन मिशन अंतर्गत लोणी भापकर योजनेचे काम करणारे उपअभियंता राजकुमार जाधव यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com