Tulsi Benefits: रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी तुळस

Tulas Natural Remedies: तुळशीच्या फुलामध्ये सुगंधी तेल असते. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. औषधी गुणधर्मासोबत कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशिअमसारख्या जीवनसत्त्वे अ, क आणि के खनिजांनी समृद्ध आहे.
Tulas
TulasAgrowon
Published on
Updated on

कु. रेणुका मिसाळ, डॉ. के. एस. गाढे

Ayurvedic Plant: तुळशीच्या फुलामध्ये सुगंधी तेल असते. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. औषधी गुणधर्मासोबत कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, लोह आणि पोटॅशिअमसारख्या जीवनसत्त्वे अ, क आणि के खनिजांनी समृद्ध आहे. तुळशीमध्ये कॅम्फेन, सिनेओल आणि युजेनॉल असते. ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखी बरे करण्यास मदत. कीटकांच्या चाव्यावर उपचारासाठी उपयुक्त. दमा आणि मूत्रपिंड आजारावर उपचार. मधुमेह, रक्तदाब आणि हृदयरोग्यांसाठी उपयुक्त.कोलेस्ट्रॉल, दम्याची लक्षणे कमी करण्यास मदत होते.

तुळशी पानांचा काढा उपयुक्त

खोकला आणि सर्दीसाठी : उकळलेल्या तुळशीच्या पानांची वाफ श्‍वासाने घ्यावी.

खोकला कमी करण्यासाठी : तुळशीची पाने मध आणि आल्यासोबत घ्यावीत.

प्रीडायबेटिक असेल किंवा टाइप २ मधुमेह असेल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचे सेवन उपयुक्त ठरते.

Tulas
Ayurvedic Herbs : औषधी गुणधर्मांनीयुक्त सर्पगंधा, तुळस

उच्च कोलेस्ट्रॉल, इन्शुलिन प्रतिरोध, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि इतर लक्षणे कमी करण्यास आणि प्रतिबंधित करण्यास मदत करते.

तुळशीमध्ये ऑसिमम साइड्स ए आणि बी असते, जे ताण कमी करण्यास आणि मेंदूतील न्यूरोट्रांसमीटर सेरोटोनिन आणि डोपामाइन संतुलित करण्यास मदत करते. युजेनॉल रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुळशीचे अ‍ॅडॉप्टोजेनिक गुणधर्म शरीराला ताणतणावाशी जुळवून घेण्यास आणि कल्याणाची भावना वाढविण्यास मदत करते.

Tulas
Tulasi Health Benefit : आरोग्यासाठी बहुगुणकारी तुळस

तुळशीमध्ये सौम्य मूत्रवर्धक आणि विषारी पदार्थ काढून टाकणारे घटक असतात, जे युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यास मदत करतात.

तुळशीची पाने पोटदुखी कमी करण्यास फायदेशीर ठरते.पचन सुलभ करून पोट स्वच्छ करते. तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात, जे पचनास मदत करतात.

ताप कमी करण्यासाठी तुळशीचा काढा तयार करावा. त्यात १५ ते २० तुळशीची पाने, आले आणि काळी मिरी मिसळावी.

तुळशीचा चहा करताना ५ ते ७ ताजी तुळशीची पाने गरम पाण्यात ५ ते१० मिनिटे भिजवावीत. चवीसाठी मध किंवा लिंबाचा रस मिसळावा.

श्‍वसनाच्या समस्या असलेल्यांनी तुळशीचा काढा प्यावा. यासाठी तुळशीची पाने, आले आणि लवंग पाण्यात उकळावे. पाण्याचे प्रमाण निम्मे झाल्यावर हा अर्क गाळून घ्यावा. दिवसभर हा कोमट काढा प्यावा.

- डॉ. के. एस. गाढे ९४२१४५९४६१

(अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com