Team Agrowon
हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. पुजा आणि धार्मिक विधींमध्ये तुळशीचे पुजन केले जाते.
मात्र, तुळशीचे महत्त्व हे धार्मिक विधींपुरतेच सिमीत नसून तुळस ही अनेक आजारांवर गुणकारी मानली जाते.
आपल्या औषधी गुणधर्मांमुळेच तुळशीला 'क्विन ऑफ हर्ब्स' असेही म्हटले जाते.
कोरोना महामारीमध्ये तुळशीच्या औषधी गुणधर्मांचा प्रत्यय आला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तुळशीच्या पानांचा काढा पिला जात होता.
तुळशीच्या बियांमध्ये असलेल्या औषधी घटकांमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
तुळशीमधील अॅंटीऑक्सिडंट शरीराला होणा-या फ्री रेडीकल्सच्या प्रभावापासून संरक्षित करतात.
तुळशीची पाने चघळल्याने किंवा खाल्ल्याने शरिराला अनेक फायदे होतात. सर्दी आणि खोकल्याच्या आजारामध्ये तुळशीची पाने खाल्ल्यास आराम पडतो.