Shakatipeeth Highway : 'शक्तिपीठ' सक्तीने लादल्यास भडका उडेल, शेतकऱ्यांनी दाखल केल्या हरकती

Shetkari Kamgar Paksh : शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीने शेतकऱ्यांचे नेतृत्व केले.
Shakatipeeth Highway
Shakatipeeth Highwayagrowon
Published on
Updated on

Shakatipeeth Mahamarg : नागपूरपासून ते गोव्याच्या सीमेपर्यंत जात असलेल्या शक्तिपीठ भक्तीमार्गाला विविध जिल्ह्यातून जोरदार विरोध होत असताना दिसत आहे. सांगली जिल्ह्याच्या ज्या गावातून हा महामार्ग जाणार आहे त्या गावकऱ्यांनी यास तीव्र विरोध केला आहे. दरम्यान शक्तिपीठ महामार्ग सक्तीने लादण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडेल. जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा महामार्गविरोधी शेतकरी संघर्ष समितीने दिला.

मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मिरजेत प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांकडे काल (ता.१९) मोठ्या संख्येने हरकती दखल केल्या.

शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकरी संघर्ष समितीने शेतकऱ्यांचे नेतृत्व केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने ७ मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार २१ दिवसांत म्हणजे २८ मार्चपर्यंत लेखी स्वरूपात हरकती व आक्षेप दाखल करता येणार आहेत. त्याची सुरुवात सोमवारी झाली.

हरकतींमध्ये म्हटले आहे की, आमच्या जगण्याचे एकमेव साधन असलेल्या बागायती जमिनींतून महामार्ग गेल्याने आम्ही उद्ध्वस्त होणार आहोत. कुटुंबवाढीमुळे आमच्या जमिनी गुंठ्यावर आल्या आहेत. महामार्गामुळे अनेक कुटुंब भूमिहीन होणार आहेत. जमिनींसाठी दडपशाही केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल. निवेदन देण्यासाठी समितीचे

समन्वयक दिगंबर कांबळे, शरद पवार, घनशाम नलवडे, प्रवीण पाटील, भूषण गुरव, दत्तात्रय बेडगे, गजानन सावंत, विष्णू सावंत, आनंदा मोरे, वामन कदम, शिवाजी शिंदे, अमर शिंदे, रमेश कांबळे, राहुल जमदाडे, राजेंद्र जमदाडे, सनी करीम, शिवराज पाटील, राहुल खाडे, सुनील कांबळे, प्रशांत कांबळे, प्रदीप इसापुरे, नीलेश पाटील आदीसह शेतकरी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

Shakatipeeth Highway
Sugar Factories Loan : लोकसभेच्या तोंडावर भाजप मर्जीतल्या साखर कारखान्यांना १८९८ कोटींची कर्जहमी

२८ मार्चनंतर महामार्ग रोखणार

कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या नियोजित शक्तिपीठ महामार्गाविरोधातील रास्ता रोको आंदोलन २८ मार्चनंतर करण्यात येणार असल्याची माहिती शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिली.

हातकणंगले तालुक्यातील साजणी येथे शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील महामार्ग प्रभावित गावातील शेतकऱ्यांचा मेळावा शनिवारी झाला. यात आज, मंगळवारी रास्ता रोको करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, गॅझेट नोटिफिकेशनवर शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्याची मुदत २८ मार्चपर्यंत आहे.

त्यामुळे शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीने शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी जागृती करण्याचे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी हे आंदोलन पुढे ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com