Sugar Factories Loan : लोकसभेच्या तोंडावर भाजप मर्जीतल्या साखर कारखान्यांना १८९८ कोटींची कर्जहमी

Kolhapur Vinay Kore : कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार विनय कोरे यांच्या तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्यांस ३५० कोटींची रक्कमेच्या हमीचा प्रस्ताव देण्यात आला.
Sugar Factories Loan
Sugar Factories Loanagrowon

Lok Sabha Election : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटातील साखर कारखान्यांना मोठी खैरात वाटण्यात येणार आहे. राज्यातील १३ सहकारी साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज घेऊन साखर कारखान्यांना देणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती आहे.

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील साखर कारखान्यांच्या प्रतिनीधींकडून सरकारकडे खेळत्या भांडवलावरील कर्जाच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. दरम्यान यावर आचारसंहितेपूर्वी राज्यातील प्रस्ताव पाठवलेल्या कारखान्यांची छाननी करून त्यानुसार सरकारच्या हमीवर कर्जाचे प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठविण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.

यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपला समर्थन करणाऱ्या १३ साखर कारखान्यांची समितीने निवड केली. त्यामध्ये भाजपचे ५ राष्ट्रवादीचे ७ आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड साखर कारखान्यास (भोर) ८० कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात आली आहे.

Sugar Factories Loan
Sugar Production : यंदा देशभरात साखरेचे उत्पादन वाढणार, इस्माकडून अंदाजे आकडेवारी जाहीर

राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांच्या कारखान्यांना ही मदत नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कर्जहमीचा प्रस्ताव एनसीडीसीला पाठविण्यात आला असून त्यांची मान्यता मिळताच कर्जाची रक्कम सरकारकडे जमा होईल.

अजित पवार गट

लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड) १०४ कोटी

किसनवीर (सातारा)३५० कोटी

किसनवीर (खंडाळा) १५० कोटी

लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) १५० कोटी

अगस्ती (अहमदनगर) १०० कोटी

अंबाजोगाई (बीड)८० कोटी

शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा) ११० कोटी

भाजपशी संबंधित

संत दामाजी(मंगळवेढा)१०० कोटी,

वृद्धेश्वर (पाथर्डी)९९ कोटी

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) १२५ कोटी

तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) ३५० कोटी

बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) १०० कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com