Adivasi Festival : सातपुड्यात भोंगऱ्या बाजाराची धूम

Festival Update : सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या भोंगऱ्या सणास प्रारंभ झाला आहे.
Bhongra Festival
Bhongra FestivalAgrowon

Jalgaon News : सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या भोंगऱ्या सणास प्रारंभ झाला आहे. होळीचे पांग फेडण्यासाठी आणि भोंगऱ्या बाजाराचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत.

सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधवांचा ''होळी'' सण हा दीपोत्सवापेक्षा कमी नसतो. होळीची चाहूल लागताच आदिवासींना भोगंऱ्या बाजाराचे वेध लागतात. येथील वाड्यापाड्यावर शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा चालत आली आहे. पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधवांच्या जीवन संस्कृतीचे दर्शन घडते.

Bhongra Festival
Agriculture Department : तालुका कृषी अधिकारी दर्जाची ६६ जणांना पदोन्नती

सातपुड्यातील आदिवासी पाड्यावर पाच दिवसाचा होळी सण साजरा होतो. पाच- सहा पाडे मिळून एकच होळी पेटविली जाते. पारंपारिक पद्धतीने आदिवासी बांधव सपत्नीक होळीचे पूजन करतात. होळी प्रज्वलित झाल्यानंतर आदिवासी महिला- पुरुष ढोल वाजवून होळीभोवती नाचगाणे करतात.

काही लोक सोंगे धारण करतात. काही लोक नवस फेडण्यासाठीही सोंगे धारण करून होळीला नैवेद्य दाखवितात. सोंगाचा नवस हा पाच वर्ष करावा लागतो, त्याला मधेच खंड पाडून चालत नाही. नवस मधेच बंद पाडला तर देवाचा कोप होतो, अशी‍ ही समजूत आहे.

Bhongra Festival
Paddy Procurement : धानाच्या खरेदीत यंदा १५ लाख क्‍विंटल घट

गावाची ओढ...

यंदाही मोठ्या प्रमाणावर पावरा बांधव सातपुड्यातील बिडगाव, कुंड्यापाणी, डूकर्णे, बलवाडी, वरला,शेवरेपाडा, बढाई, बडवाणी, वरगव्हाण, धवली, सेंधवा मध्य प्रदेश आदी ठिकाणी एकत्र येणार आले आहेत. भोंगऱ्याचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे वैभवशाली सातपुड्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

सर्व पाड्या-वस्त्यांवरुन ढोल घेऊन आलेले आदिवासी पावरा बांधवांनी "घिंचरी देवी, कनसरी देवी,राणी-का-जल देवी, देवमोगरा देवी " ची व "ढोल" ची पुजा करुन फेर घेऊन नृत्य केले. भेट म्हणून हार,कंगण,शेवया,फुटाणे यांची देवाण-घेवाणची सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com