International Biodiversity Day : ओळख देशी वनस्पतींमधील जैवविविधतेची

Indigenous Plants : जैवविविधता अबाधित राखण्यासाठी लोप पावत चाललेल्या देशी वनस्पतींचा ठेवा जपायला हवा. त्यासाठी दरवर्षी २२ मे हा ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन’ म्हणून साजरा केला जातो.
Indigenous Plants
Indigenous PlantsAgrowon

डॉ. प्रदीप दळवे

Biodiversity in Indigenous Plants : आपला देश जैवविविधतेने नटलेला आहे. आपल्या सभोवताली पशू, पक्षी, कीटक, जीव-जंतू, वनस्पती यात कमालीची विविधता आढळून येते.

यातील काही आपल्या परिचयाचे आहेत, तर काहींची ओळख नसल्याने दुर्लक्षित राहिले आहेत. या सर्वांचे संवर्धन करण्यासाठी त्यांची ओळख, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा आणि स्थितीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

अलीकडच्या काळात विकासाच्या नावाखाली सुरू असलेले नवनवीन प्रकल्प, इमारती, रस्ते, महामार्ग, लोहमार्ग आणि अशा इतर अनेक कारणांमुळे कित्तेक वर्षे उभ्या असलेल्या स्थानिक वृक्षांची बेसुमार तोड होताना दिसते. याचा विपरीत परिणाम त्या वृक्षांवर अवलंबून असलेल्या विविध पशू-पक्षी, कीटक, जीव-जंतूंवर होतो.

याशिवाय तापमानवाढ, दुष्काळ, महापूर, सुनामी, चक्रीवादळे, भूकंप, वातावरणातील बदल यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा परिणाम होतो तो वेगळाच. बेसुमारे वृक्ष तोडीमुळे धोक्यात आलेली जैवविविधता टिकवायची असेल तर स्थानिक वृक्षांच्या प्रजातींचे संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी काही उपयुक्त आणि दुर्मीळ होत चाललेल्या वनस्पतींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचे संवर्धन करणे सोपस्कर होईल.

Indigenous Plants
Crop Planting : पीक लागवडीआधी पूर्वतयारी महत्त्वाची

भोकर

हा वृक्ष उंचावरील प्रदेश आणि समशीतोष्ण हवामान वगळता संपूर्ण भारतात आढळून येतो. हा वृक्ष झपाट्याने वाढणारा असून पानझडी प्रकारातील आहे. भोकराचे झाड पाच ते सात मीटर उंच व एक खोड पद्धतीने वाढते.

डेरेदारपणामुळे याचा वापर शोभिवंत वृक्ष म्हणून केला जातो. लाकडाचा उपयोग सजावटीचे फर्निचर तयार करण्यासाठी होतो. पानांचा वापर चारा म्हणून केला जातो. याची कच्ची फळे मुख्यतः भाजी व लोणचे करण्याकरिता वापरली जातात.

पक्व फळे आकाराने स्थानिक बोराएवढी, बेचव, चिकट व फिक्कट गुलाबी रंगाची असतात. फळे अँटिऑक्सिडंट्सचे समृद्ध स्रोत मानली जातात. फळे सेवनामुळे पचनसंस्था सुधारते, पोटातील कृमींचा नाश होतो, केसांचे आरोग्य सुधारते.

गोदन

ही भोकर कुळातील वनस्पती असून फळे भोकर वनस्पतीच्या फळासारखी असतात. झाड बहुखोड पद्धतीचे व झुडूप वर्गात मोडते.

फळे मोत्याएवढी, चवीला मधुर व आकर्षक गर्द नारंगी रंगाची असतात.

जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत फुलधारणा होते. फुलांचा रंग दुधी पांढरा असतो.

फळे साधारणपणे एप्रिल-मे महिन्यांत पक्व होतात. बियांचे आवरण कठीण असल्याने उगवणक्षमता कमी असते. विविध पक्षी, खारी, वटवाघळे, माकडे, वानरे, निशाचर प्राणी यांच्या मार्फत बियांचा प्रसार होतो.

Indigenous Plants
Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

मोह

हा पानझडी आणि बहुउद्देशीय वृक्ष असून आदिवासी लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो.

मोहाची फुले खाण्यायोग्य आणि अत्यंत पौष्टिक असतात. जंगलातील विविध पशू, पक्षी, कीटक यावर आपली उपजीविका करतात.

मोहाच्या फुलांचा वापर अनेक पारंपरिक पदार्थ निर्मितीवेळी गोडवा येण्यासाठी केला जातो.

सुक्या फुलांचा उपयोग वाइन, इथेनॉल, एसीटोन आणि लॅक्टिक ॲसिड तयार करण्यासाठी केला जातो.

हादगा

या वृक्षाच्या जगभरात सुमारे पन्नास प्रजाती आढळतात. त्यापैकी सीता, पिता, नीला आणि लोहिता या चार प्रजाती महत्त्वाच्या मानल्या जातात. ‘सीता’ प्रजातीला पांढऱ्या रंगाची, ‘पिता’ प्रजातीला पिवळ्या रंगाची तर ‘नीला’ या प्रजातीतील झाडांना नावाप्रमाणेच निळ्या रंगाची फुले येतात. तर लाल रंगाची फुले येणाऱ्या वाणाला ‘लोहिता’ म्हणून ओळखले जाते.

या झाडाची फुले आणि शेंगा भाजीकरीता, तर पाने जनावरांना खाद्य म्हणून वापरली जातात.

डॉ. प्रदीप दळवे, ८९८३३ १०१८५,

(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके (अंजीर आणि सीताफळ)

संशोधन प्रकल्प, जाधववाडी, ता. पुरंदर जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com