Orchard Cultivation : फळबाग लागवडीत ४१८ हेक्टरने घट

Cultivation Update : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ३५४.९० हेक्टर आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ५८०.८० हेक्टर मिळून एकूण ९३५.७० हेक्टर फळबाग लागवड झाली आहे.
Orchard Cultivation
Orchard CultivationAgrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ३५४.९० हेक्टर आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ५८०.८० हेक्टर मिळून एकूण ९३५.७० हेक्टर फळबाग लागवड झाली आहे. त्यात गेल्या वर्षी लागवड झालेल्या १ हजार ३५३.५८ हेक्टरच्या तुलनेत ४१७.३० हेक्टरने घट झाली आहे.

२०२३ मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ७६१.३० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५२२.५० मिलिमीटर (६८.६० टक्के) पाऊस झाला. परिणामी, जिल्ह्यात दुष्काळी स्थिती उद्‍भवली. त्यामुळे ‘मनरेगा’ तसेच ‘पोकरा’अंतर्गत शेतकऱ्यांचे फळबाग लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले. २०२३-२४ मध्ये ‘मगांराग्रारोहयो’अंतर्गत १ हजार ४५२ हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट होते. परंतु प्रत्यक्षात ३५४.९० हेक्टर एवढेच उद्दिष्ट साध्य झाले आहे.

Orchard Cultivation
Orchard Cultivation : ‘मनरेगा’अंतर्गत फळबाग लागवडीत कृषी विभाग अव्वल

परभणी तालुक्यात ५२.८५ हेक्टर, जिंतूरला ५९.३७ हेक्टर, सेलूमध्ये ३३.९० हेक्टर, मानवतमध्ये ३८.४० हेक्टर, पाथरीत ३८.१० हेक्टर, सोनपेठमध्ये ७ हेक्टर, गंगाखेडला १९.२७ हेक्टर, पालममध्ये ५४.४० हेक्टर, तर पूर्णा तालुक्यात ५१.६१ हेक्टरवर लागवड झाली आहे.

आंबा, पेरू, चिकू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, लिंबू, नारळ, सीताफळ, केळी आदी फळझाडांची शेतकऱ्यांनी लागवड केली आहे.

२०२३-२४ मध्ये ‘पोकरा’अंतर्गत जिल्ह्यात एकूण ९३५.७० हेक्टर लागवड झाली आहे. त्यात परभणीत ३०२.८० हेक्टर, जिंतूरला ५०.४० हेक्टर, सेलूमध्ये ६१.६० हेक्टर, मानवतला ४१.६० हेक्टर, पाथरीत २६.८० हेक्टर, सोनपेठमध्ये ८ हेक्टर, गंगाखेडमध्ये १९.२० हेक्टर, पालममध्ये ३६.४० हेक्टर, पूर्णा तालुक्यात ३४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली.

Orchard Cultivation
Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

परभणी जिल्ह्यातील फळबाग लागवड (हेक्टरमध्ये)

तालुका २०२२-२३ २०२३-२४

परभणी ३०५.४० ३५५.६५

जिंतूर १७८.६८ १०९.७७

सेलू ६७.३२ ९५.५०

पाथरी १४०.९४ ६४.९०

मानवत १४३.३१ ८०.००

सोनपेठ ९८ १५.००

गंगाखेड १३९.१५ ३८.४७

पालम १३९.५० ९०.८०

पूर्णा १४१.९४ ८५.६१

यंदा ‘मनरेगा’तून दीड हजार हेक्टरचे उद्दिष्ट

‘मनरेगा’तून २०२४-२५ या वर्षासाठी जिल्ह्यात १ हजार ५०० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यात परभणी तालुक्यात २७० हेक्टर, जिंतूरमध्ये २७० हेक्टर, सेलूमध्ये १४०, मानवतला १३५, पाथरीत १४०, सोनपेठमध्ये १३०, गंगाखेडला १४० हेक्टर, पालममध्ये १३५ हेक्टर, पूर्णा तालुक्यात १४० हेक्टर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com