Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Ambadi Vegetable : अंबाडीची पाने चवीने आंबट असतात. पाने कोवळी असताना भाजी करतात. याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑइल’ म्हणतात.
Ambadi Vegetable
Ambadi VegetableAgrowon

शिवानी ठोंबरे, डॉ. पी. यू. घाटगे, डॉ. व्ही. एस. पवार

Ambadi Leaves : अंबाडीची पाने चवीने आंबट असतात. पाने कोवळी असताना भाजी करतात. याच्या बियांपासून तेल काढतात. त्यास ‘हॅश ऑइल’ म्हणतात. यामध्ये टेट्राहायड्रोकॅनॉनिबॉल (टीएचसी) नावाचा विशेष घटक भरपूर प्रमाणात असतो.

त्यामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात. मानवी शरीरासाठी आवश्यक घटक या वनस्पतीमध्ये भरपूर प्रमाणात आहेत.

औषधी गुणधर्म

पाने, बिया आणि फुलांचा वापर औषध बनवण्यासाठी करतात.

पाने तसेच पुष्पमुकुटामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम, लोह तसेच जीवनसत्त्व क चे प्रमाण जास्त असल्यामुळे ते स्कर्व्ही आजारावर उपचारासाठी उपयुक्त ठरते.

अंबाडीची फळे थोड्या प्रमाणात पाण्यात शिजवून पेय बनवतात. हे खोकला आणि पोटाच्या समस्यांवर उपयुक्त आहे. वनस्पतीच्या फुलांचे सरबत बनवतात, हे पचनास मदत करते.

बिया औषधामध्ये उपयुक्त ठरतात. पानाचा शेक वेदना कमी करण्यासाठी तसेच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.

Ambadi Vegetable
Healthy Rajgira :आरोग्यदायी राजगिरा

अंबाडी भाजी खाण्याचे फायदे

हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते. खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी पर्याय आहे. यामध्ये कॅलरी कमी असतात. भरपूर जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक असतात.

जीवनसत्त्व अ, लोह, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त.

यामध्ये जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर प्रमाणात आहेत. केस मजबूत आणि निरोगी होतात. केस गळणे किंवा सहजपणे तुटणे टाळता येते.

यामध्ये कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत करण्यास मदत करते. ऑस्टियोपोरोसिस आजारापासून संरक्षण मिळते.

लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. रक्तल्पता किंवा ॲनिमिया आजार असणाऱ्यांनी दैनंदिन आहारामध्ये अंबाडी भाजीचा समावेश करावा.

अंबाडीमध्ये डाययुरेटिक गुण असल्याने लघवीला जळजळ होणे, उन्हाळे लागणे यावर ही भाजी उपयुक्त ठरते.

अंबाडी पचायला आणि शिजायला सोपी आहे. त्यामध्ये भरपूर स्टार्च असतात. हे पोट निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

Ambadi Vegetable
Healthy Rajma : आरोग्यासाठी फायदेशीर राजमा

योग्य प्रमाणामध्ये अंबाडीचे सेवन

अंबाडीमध्ये ऑक्सॅलिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने ऑक्सलेट विषबाधा होऊ शकते. यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टला हानी पोहोचवून प्रतिकूल परिणाम होतात.

अंबाडीमुळे काही व्यक्तींना आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. सामान्यत: वेदनाशामक औषधांचा अतिवापर, अँटिबायोटिक्स, अकाली पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, चिंच आणि मसाल्याचा अतिरेकी वापर यामुळे ॲसिडिटी होते. अंबाडी १० मिनिटे उकळून पाणी टाकून द्यावे. डाळ आणि करी तयार करण्यासाठी ब्लँच केलेल्या अंबाडीचा वापर करावा. यामुळे तुम्हाला अॅसिडिटीशी संबंधित त्रासापासून आराम मिळेल.

स्तन्यपान करताना अंबाडीचे सेवन करू नये.

त्वचेची ॲलर्जी आणि दमा असलेल्या लोकांनी अंबाडी टाळावी.

अंबाडीमध्ये भरपूर ऑक्सॅलिक ॲसिड असते, जे जास्त झाल्यास किडनी स्टोन होऊ शकतो. त्यामुळे किडनी स्टोन आजार असणाऱ्यांनी अंबाडीची भाजी खाणे टाळावे.

भाजी करताना घ्यावयाची काळजी

अंबाडीची भाजी तांब्याचे भांडे, बीडाची भांडी किंवा अल्युमिनियमची भांड्यामध्ये करू नये. कारण अंबाडीच्या भाजीमध्ये ऑक्सॅलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन अपायकारक घटक तयार होतो. भाजी शिजवण्यासाठी, नॉन-स्टीक किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी वापरावीत.

अंबाडीपासून पदार्थ निर्मिती

चहा

साहित्य : आले, गूळ, पाणी आवश्यकतेनुसार

कृती : पाने उन्हात वाळवून कोरडी करावीत. त्यामध्ये आले आणि गूळ मिसळून पाण्यात उकळून घ्यावे. हे मिश्रण गाळून चहा म्हणून सेवन करावे.

लोणचे

साहित्य ः १ किलो अंबाडे, २५० ग्रॅम जाडे मीठ, १०० ग्रॅम राईची डाळ, १ चमचा मेथी, १ छोटा चमचा हिंग, ४ चमचे हळद, ८ चमचे लाल तिखट, तेल पाव किलो.

कृती

अंबाडी स्वच्छ धुऊन त्याच्या उभ्या चार फोडी कराव्या. मीठ भाजून घ्यावे, थोड्या तेलावर मेथी परतावी. मीठ व मेथी एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावी.

मोहरीचा गर, हिंग, हळद, लाल तिखट, बारीक केलेले मेथीसकट मीठ एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण अंबाडीच्या फोडींवर मिसळून घ्यावे.

कढईत तेल चांगले कडकडीत तापवून थंड करून या मिश्रणावर ओतून एकजीव करावे. आठ दिवसांनी लोणचे वापरण्यास सुरुवात करावी.

ज्यूस

साहित्य : १ कप अंबाडी भाजी, १/२ कप गूळ, १/२ कप पाणी

कृती

प्रथम अंबाडी भाजी धुऊन पाण्यामध्ये १५ मिनिटे भिजवून ठेवावी.

दुसऱ्या पातेल्यामध्ये गूळ आणि पाणी मिसळावे. ते गरम होईपर्यंत उकळावे. उकळल्यानंतर त्यात अंबाडी भाजी टाकावी. अंबाडी भाजी आणि गुळाच्या पाण्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करावे.

शिवानी ठोंबरे, ७०८३५३७३३२

(अन्न व पोषण विभाग,अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com