ICAR, Mahyco Agreement: संशोधन-विस्तार क्षेत्रात ‘आयसीएआर’-महिकोत करार

Agriculture Innovation: भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) खासगी सार्वजनिक भागीदारीला प्रोत्साहन देत त्या माध्यमातून संशोधनाला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ICAR, Mahyco Agreement
ICAR, Mahyco AgreementAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) खासगी सार्वजनिक भागीदारीला प्रोत्साहन देत त्या माध्यमातून संशोधनाला बळकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील शेतकऱ्यांना याद्वारे शाश्‍वत शेती पद्धतीचा पर्याय उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावीत आहे. याच उद्दिष्टपूर्तीवर भर देत ‘आयसीएआर’ने त्यांच्या स्थापनादिनी बुधवारी (ता.१६) खासगी बियाणे उत्पादक कंपनी महिकोसोबत सामंजस्य करार केला.

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गंत असलेल्या देशातील विविध राज्यांमध्ये तब्बल कृषी व संलग्न क्षेत्राशी निगडीत ७४ कृषी विद्यापीठे आहेत. त्यामध्ये ६३ विविध विषयांवरील, तर ११ केंद्रिय कृषी विद्यापीठांचा समावेश आहे.

ICAR, Mahyco Agreement
VNMKV Parbhani : वनामकृवि, आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्यात सामंजस्य करार

त्याच्या जोडीला पीकनिहाय १०० पेक्षा अधिक संशोधन संस्था व तंत्रज्ञान विस्ताराच्या उद्देशाने सुमारे ७३१ केव्हीके आहेत. परंतु या माध्यमातून दर वर्षी मोठ्या प्रमाणावर वाण विकसित होत असताना शेतकऱ्यांमध्ये मात्र हे वाण, तंत्रज्ञान लोकप्रिय नाही. त्यामुळेच वाण, तंत्रज्ञानाची संख्या वाढविण्यापेक्षा त्याची उपयोगिता महत्त्वाची आहे, असे मत नुकतेच केंद्रिय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्‍त केले होते.

शेतकऱ्यांना गरजेवर आधारित तंत्रज्ञानाची उपलब्धता व्हावी याकरिता खासगी कंपन्यांच्या संशोधन आणि विस्तार (आरॲँडडी) प्रक्षेत्राचाही उपयोग करण्याची सूचना श्री. चौहान यांनी केली होती. त्याची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी संशोधनाला चालना मिळावी याकरिता महिको कंपनीशी सामंजस्य करार केला आहे.

ICAR, Mahyco Agreement
Agriculture Trade Dispute: शेती, डेअरीवरून अडला व्यापार करार

यातून अन्नसुरक्षा अधिक भक्‍कम होईल, असा विश्‍वास श्री. चौहान यांनी व्यक्‍त केला. कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासोबतच शिक्षण आणि शाश्‍वतता वाढविण्यासाठी देखील या करारात भर देण्यात आला आहे. या वेळी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट तसेच महिको संचालकांची उपस्थिती होती.

करारांअंतर्गंत या क्षेत्रात होणार काम

- हवामान लवचिक आणि जैव सुदृढ पिके

- अचूक शेती

- कीडरोग प्रतिरोधक बियाणे व वाण

- शाश्‍वत शेती पद्धती

- उद्यानविद्या क्षेत्रातील संशोधन

- शेतकरी प्रशिक्षण आणि विस्तार कार्यक्रम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com