Water Circulation : पाणी आवर्तनासाठी उपोषण सुरूच

Farmer Water Demand : पाण्याच्या आवर्तनासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच उपोषण सोमवारीही (ता. ६) दुपारपर्यंत सुरूच होते. प्रशासन बैठकात व्यस्त मात्र निर्णय होत नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.
Hunger Strike
Hunger Strike Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : पाण्याच्या आवर्तनासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच उपोषण सोमवारीही (ता. ६) दुपारपर्यंत सुरूच होते. प्रशासन बैठकात व्यस्त मात्र निर्णय होत नसल्याची खंत उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.

वैजापूर व गंगापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर जलद कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांतर्फे पाणी आवर्तनासाठी शुक्रवारी (ता. ३) वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सायंकाळपर्यंत मागणी मान्य न झाल्याने या मोर्चाचे रूपांतर उपोषणात करण्यात आले. शुक्रवारी (ता. ३) दिवसभरात छत्रपती संभाजीनगर येथे बैठक झाली निर्णय मात्र झाला नाही.

Hunger Strike
Water Circulation : जलदगती कालव्यात आवर्तन सोडण्याचा निर्णय नाहीच

निर्णय झाला की कळवतो असे उत्तर मोर्चेकऱ्यांना मिळत होते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्याने आधार शेतकरी जलदूत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आक्रोश मोर्चाचे उपोषणात रूपांतर करण्यात आले. आधार शेतकरी जलदुत समितीचे प्रमुख पंडित अण्णा शिंदे, सोन्याबापू शिरसाठ, रामचंद्र पिल्दे, योगेश तारु, सचिन गायकवाड, मंदाताई न्हावले आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.

पाण्याच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर सावखेडगंगा येथील ग्रामपंचायत ने जलद गती कालव्याला तात्काळ पाण्याच्या आवर्तन सोडल्यास १३ मे रोजी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव घेतला. असेच ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायती संख्या आता वाढू लागली आहे.

Hunger Strike
Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

शिवाय उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोमवारी उपोषण सुरू असतानाच मंगळवारी (ता. ७) अनेक ठिकाणच्या महिला व पुरुष शेतकरी उपोषणकर्त्यांसह वैजापूर येथील सिंचन विभागाच्या कार्यालयावर महिला पुरुष शेतकऱ्यांचा हंडा मोर्चा काढण्याचा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतल्याची माहिती पंडित शिंदे यांनी दिली.

दुष्काळी स्थितीत नियमाप्रमाणे नांदूर मधमेश्वर जलद कालव्यातून गंगापूर, वैजापूर तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडणे गरजेचे होते. यासंदर्भात आधार शेतकरी जलदूत समितीतर्फे वेळोवेळी पाठपुरावा करूनही उन्हाळी पाणी आवर्तन सोडले नाही. त्यामुळे ३ मे पासून हक्काचे आवर्तनाचे पाणी नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात तात्काळ सोडण्यासाठी उपोषणाचे हत्यार उपसण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com