Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

Water Issue : कळंबा परिसरातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. कळंबा तलाव कोरडा पडला आहे. येथील परिसरात अनेक विहिरींनी तळ गाठला असून कूपनलिकांचे पाणी बंद झाले आहे.
Water Issue
Water IssueAgrowon

Kolhapur News : कळंबा परिसरातील भूजल पातळीत मोठी घट झाली आहे. कळंबा तलाव कोरडा पडला आहे. येथील परिसरात अनेक विहिरींनी तळ गाठला असून कूपनलिकांचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे ऊस शेतीसह अनेक पिके वाळत आहेत.

दरम्यान २०२३ मधील अनियमित पाऊस, बेसुमार पाणी उपसा व यंदाचा तीव्र उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन होऊन जलसाठ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा येथील शेतकऱ्यांनी उसाचे १२०० हेक्टर क्षेत्र कमी केले आहे. त्याचबरोबर नुकत्याच काढलेल्या भुईमूग, सूर्यफूल या तेलगळीत पिकांना नियमित पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे उत्पन्नात घट झाली आहे. कळंबा गावची जीवनदायी म्हणून कळंबा तलावाकडे पाहिले जाते.

Water Issue
Water Scarcity : ‘हर घर जल’ नव्हे; श्रीवर्धनमध्ये ‘हर गाँव टँकर’

पावसाळ्यात तलाव तुडुंब भरून भूमिगत विसर्ग प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे येथील कूपनलिका व विहिरीमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होतो. मात्र गेल्या वर्षी पावसामुळे तलाव काठोकाठ भरला होता. वर्षभर तलावामधून कळंबा व निम्म्या शहराला दररोज नऊ एमएलडी पाणी उपसा करून पुरवठा केला आहे. यंदाचा उन्हाळा अधिकच तीव्र झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पातळीत मोठी घट झाली आहे.

त्यामुळे तलावाचे तिन्ही बाजूंचे पात्र कोरडे पडले आहे. परिसरातील शंभर कूपनलिकांचे पाणी बंद झाले आहे. ५० हून अधिक विहिरींनी तळ गाठला आहे. प्रशासनाने शेतीसाठी नदीपात्रातील पाणी उपसा बंद केला आहे. त्यामुळे दोन महिने शेती पिकांचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ऊस शेतीसह अनेक पिके मोठ्या प्रमाणात वाळू लागली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

Water Issue
Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

पर्यायी व्यवस्थाच नाही

कळंबा गावाला तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र तलावातील पाणीपातळी खालावल्यामुळे गावाला अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. प्रशासनाने दुष्काळग्रस्त यादीमध्ये गावचा समावेश केला आहे. मात्र पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे गावात भीषण पाणीटंचाई सुरू झाली आहे.

कळंबा कात्यायनी परिसरामधील कूपनलिका बंद पडल्या आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. पाण्याअभावी ऊस शेती वाळू लागली आहे.
दीपक तिवले, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com