Canal Work Hunger Strike : कालव्याच्या कामाच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे

Strike Update: निमगाव (ता. माळशिरस) येथील लघू पाटबंधारे तलावाच्या कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेला उपोषणाचा निर्णय तहसीलदारांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आला.
Farmers
Farmers Agrowon
Published on
Updated on

Solapur News : निमगाव (ता. माळशिरस) येथील लघू पाटबंधारे तलावाच्या कालव्याचे काम पूर्ण करून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घेतलेला उपोषणाचा निर्णय तहसीलदारांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आला.

निमगाव येथील लघू पाटबंधारे तलावावर ११.४ किलोमीटर लांबीचा कालवा सन १९९२ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यापैकी ९.४ किलोमीटर कालवा नीरा उजवा कालवा विभागाने ताब्यात घेऊन सन २०२३ मध्ये त्याच्या दुरुस्तीच्या निविदा निघाल्या

Farmers
Niphad Sugar Mill : ‘निसाका’तील ड्रायपोर्टसाठी भूसंपादनाचे दर निश्चित

मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून निविदेनुसार पूर्ण कालव्याचे काम न झाल्याची लाभार्थी शेतकऱ्यांची तक्रार होती, ही कामे तातडीने व चांगल्या प्रतीची करावीत आणि या पूर्ण झालेल्या ९.४ किमी या संपूर्ण कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी करत शेतकरी गेले कित्येक दिवस उजनी उजवा कालव्याचे अधिकारी यांना भेटत होते.

Farmers
Sugarcane FRP : ‘एफआरपी’चे ८४६ कोटी कारखान्यांकडे थकित

मात्र अधिकारी त्यांना दाद देत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले होते. तसे निवेदनही दिले. मात्र तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी मध्यस्थी करून नीरा उजवा कालव्याचे माळशिरस येथील कार्यकारी अधिकारी आ. वि. पासलकर यांच्याशी चर्चा करून कालव्यात पाणी सोडण्याचे लेखी आश्‍वासन दिले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यापर्यंत उपोषण स्थगित केले. या वेळी डॉ. गोरख मगर, विकास मगर, अमर माने-देशमुख, खंडू मगर, नारायण मगर, राहुल मगर, शंकर काटकर, पिंटू कदम, शंकर मगर यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com