Mango Tree Burnt : ऐन बहरात शेकडो आंब्याची झाडे खाक

Mango Tree Update : उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील डोंगराला काही समाजकंटकांकडून लावलेल्या आगीमुळे बहरलेली शेकडो आंब्याची झाडे जळल्याची घटना घडली
Mango Tree
Mango TreeAgrowon
Published on
Updated on

Uran News : उरण तालुक्यातील चिरनेर परिसरातील डोंगराला काही समाजकंटकांकडून लावलेल्या आगीमुळे बहरलेली शेकडो आंब्याची झाडे जळल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Mango Tree
Cashew Tree Burnt : मळगाव येथे आगीत काजूची शेकडो झाडे जळाली

काही दिवसांपूर्वी चिरनेरच्या डोंगराला समाजकंटकांनी आग लावली होती. डोंगराशेजारी असलेल्या शेतीत वर्षानुवर्षे अहोरात्र मेहनत करून जगविलेली चिरनेरमधील संदेश चिर्लेकर, तुळशीदास चिर्लेकर, काशिनाथ खारपाटील, प्रशांत म्हात्रे, राजू चिर्लेकर, रमेश फोफेरकर आणि इतर शेतकऱ्याची शेकडो आंब्याची झाडे यात जळून खाक झाली.

Mango Tree
Hapus Mango : उन्हात भाजतोय हापूस

या आगीमुळे शेतकऱ्यांची फळांनी बहरलेली शेकडो आंब्याची कलमे नष्ट झाली. या आगीमुळे हातात आलेल्या आंब्याच्या पिकांचे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपच्या पिकांचे पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. निवडणुकीच्या कामात व्यग्र असलेल्या कर्मचाऱ्यांना या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

शेतकऱ्यांनी वणव्यात जळलेल्या आंब्याच्या झाडांच्या नुकसानीबाबत तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा. तहसीलदारांनी आदेश दिल्यास महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने संयुक्तरीत्या पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.
अर्चना सुळ, तालुका कृषी अधिकारी, उरण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com