Kharif Season : पावसाअभावी वाया गेलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा : इंद्रजित थोरात

Crops Destroyed Due to Heavy Rains : अहमदनगर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. संगमनेर तालुक्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असून ही पेरणी पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली आहे.
indradjeet thorat
indradjeet thoratAgrowon
Published on
Updated on

Ahmednagar News : दोन महिने उलटून गेले तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. संगमनेर तालुक्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली असून ही पेरणी पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली आहे. यामुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडला असून सरकारने तातडीने या सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरीव मदत द्यावी, अशी मागणी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केली आहे.

indradjeet thorat
Onion Subsidy for Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील ३१ हजार अपात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदान

संगमनेर तालुक्यातील अनेक भागात पाऊस नाही शुक्रवारी (ता.१८) संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने वडगाव पान, निळवंडे परिसरातील पिकांची पाहणी करण्यात आली. यावेळी इंद्रजित थोरात, बाबासाहेब ओहोळ, मिलिंद कानवडे, विलास कवडे, आदींचा विविध काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. इंद्रजितभाऊ थोरात म्हणाले, की सरकार घोषणा मोठमोठ्या करते आहे, मात्र मदत दिली जात नाही.

तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती ते सोयाबीन व खरिपाची इतर पूर्ण पिके जळून गेली आहेत. बियाणे व खतांसाठी मोठा खर्च करूनही हा हंगाम वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने सर्व सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठी भरीव मदत केली पाहिजे.

indradjeet thorat
Lumpy Skin : नगर जिल्ह्यात वाढतोय ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव

आताच दुष्काळ पडला आहे. शेतकरी संकटात आहे. पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई आहे. या काळात सरकारने घोषणा न करता तातडीने मदत करावी. तळेगाव पट्ट्यासह दुष्काळी भागातील शेतकरी कमी पावसामुळे अत्यंत अहवालदिल  झाला आहे. मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके आता डोळ्यादेखत जळून चालली आहे. याकरिता सरकारने त्वरित मदत करावी.

राज्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात असून कांदा पिकाचे अनुदान अद्याप जमा झालेले नाही. सरकारने घोषणा मोठ्या केल्या. मात्र अंमलबजावणी केली नाही. तरी तातडीने कांदा पिकाचे अनुदान सरकारने शेतकऱ्यांना द्यावे अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com