
Desk job vs Field Work: एप्रिल महिना हा सुट्ट्यांचा असतो. बँका सलग किती दिवस बंद राहणार अशा बातम्या येत असतात. बँक बंद राहिल्याने होणाऱ्या नुकसानीची आपण काळजी करतो. परंतु शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय बंद राहिल्याने होणाऱ्या नुकसानीची मात्र चर्चा होत नाही. जयंत्या पुण्यतिथ्या, सण, धार्मिक उत्सव यांना सुट्टी न दिल्यास अनेकांच्या भावना दुखावतील, असे सरकारला वाटते. शेतकरी आणि तमाम कष्टकरी व्यापारी हे अशा जयंत्या पुण्यतिथ्या, सण-उत्सव या दिवशीही कष्ट करत राहतात. त्यांच्या कोणत्याही भावना दुखावत नाहीत, हे विशेष!
३०० दिवस हवेत कामाचे
या देशात विशेषतः शिक्षण क्षेत्रात इतक्या सुट्ट्या आहेत की सुट्ट्यांमध्ये कामाचे दिवस बसवलेत असेच वाटत राहते. शिक्षण हक्क कायद्यात शाळा किमान २२० दिवस भरावी असे म्हटले आहे. यापेक्षा जास्त दिवस शाळा भरली तरी चालेल, पण तेच दिवस अंतिम मानले जातात. वास्तविक ३०० दिवस हे कामाचे असले पाहिजेत. ५२ रविवार व ७६ दिवस सुट्टी अशी १२८ दिवस सुट्टी अधिकृत आहे.
५२ रविवारची सुटी योग्य आहे, पण ७६ दिवसांची सुट्टी का दिली जाते, याची उलटतपासणी करायला हवी. उलट ५२ रविवार सोडून मोठ्या धार्मिक सणांच्या १० सुट्ट्या सोडून एकही सुट्टी नसली पाहिजे. ३६५ पैकी ३०० दिवस शाळा व कार्यालये सुरू असली पाहिजेत. शनिवार कार्यालये पूर्णवेळ सुरू असली पाहिजे. शाळाही शनिवारी ‘हाफ डे’ नाही तर पूर्ण दिवस चालल्या पाहिजेत.
यात सर्वात जास्त काळ सुट्टी ही मे महिन्याची आहे. ब्रिटिशांना इथला उन्हाळा सहन होत नसल्याने न्यायालये आणि शिक्षणात या सुट्ट्या आल्या. उन्हाळ्यात मुलांना परीक्षा झाल्यावर आठ दिवस सुट्टी द्यावी, पण ४१ दिवसांची सुट्टी दिली आहे. ऊन असले तरी अगदी सकाळी ७ ते १० शाळा, महाविद्यालय भरवणे अशक्य आहे का? त्यात व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम, छंदवर्ग घेणे अगदीच शक्य आहे व त्या दिवशी उरलेल्या वेळेत शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व विकास करणारे प्रशिक्षण, प्रकल्प, वाचन असे काही करता येईल व सुट्टी देण्यापेक्षा शिक्षक व विद्यार्थी यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हा काळ वापरायला हवा.
सुट्टीच्या काळात वेतन दिले जाते तर मुलांना उन्हामुळे सुट्टी असताना तो वेळ शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वापरावा. दिवाळी पाच दिवसांची असताना १५ दिवस सुट्टी का दिली जाते? इतर सर्व खासगी कार्यालये, कारखाने लगेच उघडतात मग शाळा, कॉलेजांना जास्त सुट्टी कशाला? अनेक शाळा, महाविद्यालयात एकही ख्रिस्ती विद्यार्थी नसताना १० दिवस नाताळाची सुट्टी कशासाठी, हे आता ठामपणे विचारायला हवे.
सण साजरे करताना व महापुरुषांना वंदन करताना सुट्टी हाच उपाय का दिसतो? यावर विचार करण्याची गरज आहे. जयंती पुण्यतिथीला सुट्टी देऊन आपण त्या महापुरुषांचा परिचय मुलांना होऊ देत नाही. उत्तर प्रदेश सरकारने त्यासाठी जयंती पुण्यतिथीच्या सुट्ट्या रद्द केल्या व शाळेत कार्यक्रम घ्यायला सांगितले. आपल्याकडे आदर व्यक्त करण्यासाठी सुट्टी हे उत्तर असते. एका धर्माच्या सणाच्यावेळी दुसऱ्या धर्माच्या व्यक्तींनी काय करणे अपेक्षित आहे? ज्या अनेक जिल्ह्यांत एकही पारशी कुटुंब नाही तिथे पारशी दिनाची सुट्टी दिली जाते.
पुन्हा आषाढी एकादशी, घटस्थापना, रामनवमी, गुढीपाडवा, महावीर जयंती, बुद्धपौर्णिमा, ईद या सणांच्या प्रार्थना मंदिरात जाऊन फक्त दर्शन घेण्यासाठी संपूर्ण दिवस सुट्टी घेणे गरजेचे आहे का? अल्पसंख्य समुदायाच्या विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयात संख्या कमी असल्याने त्यांना त्या सणाला सुट्टी देऊन इतर विद्यार्थ्यांसह शाळा कॉलेज चालू शकते. या सुट्ट्या इकडे असताना खासगी क्षेत्रात मात्र यातील कोणत्याही सुट्ट्या दिल्या जात नाहीत. पण तिथे कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावत नाहीत. सगळे लाड सरकारी क्षेत्रातच चालतात. सण व जयंतीच्या सुट्ट्या रद्द कराव्यात कारण एक दिवसाचा पगारावरील खर्च ही खूप मोठी किंमत आहे. ज्यांना असे सण साजरे करायचे आहेत त्यांनी रजा घ्याव्यात.
तासांचे व्हावे काटेकोर मोजमाप
शिक्षण हक्क कायद्याने प्राथमिक शाळा ८०० घड्याळी तास व माध्यमिक शाळा १००० तास सुरू राहाव्यात असे नमूद केले आहे. पण त्यातही सकाळच्या शाळा करण्यासाठी संघटना आग्रह धरतात. त्यात अपडाउनमुळे कमी काळ अध्यापन होते. महिना अखेरला अर्धी सुटी, शनिवारी सकाळी शाळा भरवून तास कमी होतात. हे १००० तास प्रत्यक्ष अध्यापनाचे म्हटले आहे, त्यामुळे शाळेत होणारे इतर कार्यक्रमाचे तास त्यात धरायचे की नाही? यावर चर्चा करावी लागेल. पुन्हा वार्षिक परीक्षा झाल्यावर निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते.
त्यामुळे ते दिवस एकूण मुलांच्या हजेरी मांडून एकूण कामकाज दिवसात धरले जातात. असे करणे चुकीचे आहे. मुले शाळेत नसताना ते तास मोजणे गैर आहे. असे काटेकोर तास मोजले तर कामाचे आणखी दिवस वाढवावे लागतील. त्याचप्रमाणे दर आठवड्याला शिक्षक ४५ तास शाळेत असावेत त्यात ३० तास अध्यापन व्हावे व १५ तास ही पूर्वतयारी असावी. आता ही पूर्वतयारी मोजण्याची कोणतीच वस्तुनिष्ठ पद्धत विकसित केलेली नाही. रोज दोन तास १२ मिनिटे शिक्षक नेमकी काय स्वरूपाची पूर्वतयारी करत आहेत?
कोणते वाचन करत आहेत? ती पूर्वतयारी घरी करायची की शाळेत? त्याच्या नोंदी कोण तपासते? याबाबत काहीच घडत नाही. शिक्षण हक्क कायद्यात या तरतुदी असून गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. हे रोजचे दोन तास मोजायचे ठरवले तर शाळेचे तास वाढवावे लागतील, त्यातून दिवसही वाढतील. संघटना अधिवेशनासाठी सुटी मागतात, हे दिवस भरून काढले जातात का?
हे सर्व बघितल्यावर लक्षात येते, की सर्वच सुट्ट्यांचा फेरविचार करायला हवा. आपल्यासारख्या गरीब देशाला ४ ते ५ महिने पगारी सुट्टी देणे परवडणार नाही. परदेशात शाळा कमी दिवस भरतात असे सांगितले जाते, पण तिकडे कुटुंबात, समाजात अनौपचारिक शिक्षण होऊ शकते. आपल्याकडे त्याप्रकारे पालक अनौपचारिक शिक्षण करू शकत नाही, हे कोरोना काळात आपण अनुभवले आहे.
शेवटी एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यावे, की कल्याणकारी राज्याची यंत्रणा चालविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी सुट्या कमीत कमी असाव्यात आणि सुट्ट्या हा हक्क समजणाऱ्या त्यांच्या एक दिवसाच्या पगाराची आठवण करून द्यावी व शेतकरी Desk job vs field work कष्टकरी व्यापारी पूर्णवेळ काम करतात. कोणतेही सण, उन्हाळा, जयंती याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ देत नाहीत, हे लक्षात आणून देण्याची गरज आहे.
herambkulkarni1971कोणते वाचन करत आहेत? ती पूर्वतयारी घरी करायची की शाळेत? त्याच्या नोंदी कोण तपासते? याबाबत काहीच घडत नाही. शिक्षण हक्क कायद्यात या तरतुदी असून गांभीर्याने घेतल्या गेल्या नाहीत. हे रोजचे दोन तास मोजायचे ठरवले तर शाळेचे तास वाढवावे लागतील, त्यातून दिवसही वाढतील. संघटना अधिवेशनासाठी सुटी मागतात, हे दिवस भरून काढले जातात का?
हे सर्व बघितल्यावर लक्षात येते, की सर्वच सुट्ट्यांचा फेरविचार करायला हवा. आपल्यासारख्या गरीब देशाला ४ ते ५ महिने पगारी सुट्टी देणे परवडणार नाही. परदेशात शाळा कमी दिवस भरतात असे सांगितले जाते, पण तिकडे कुटुंबात, समाजात अनौपचारिक शिक्षण होऊ शकते. आपल्याकडे त्याप्रकारे पालक अनौपचारिक शिक्षण करू शकत नाही, हे कोरोना काळात आपण अनुभवले आहे.
शेवटी एक महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यावे, की कल्याणकारी राज्याची यंत्रणा चालविण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी सुट्या कमीत कमी असाव्यात आणि सुट्ट्या हा हक्क समजणाऱ्या त्यांच्या एक दिवसाच्या पगाराची आठवण करून द्यावी व शेतकरी कष्टकरी व्यापारी पूर्णवेळ काम करतात. कोणतेही सण, उन्हाळा, जयंती याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ देत नाहीत, हे लक्षात आणून देण्याची गरज आहे.
herambkulkarni1971@gmail.com
(लेखक शिक्षण, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)@gmail.com
(लेखक शिक्षण, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.