Team Agrowon
जमीनीचे छोटे छोटे तुकडे...अगदी पाव बिघापासून ते दोन-तीन बिघापर्यंत.गावातील सर्वात मोठा शेतकरी १५ बिघेवाला.
यामुळं धान पेरलेल्या जमिनीचे आकार चित्र,विचित्र म्हणण्यासारखे! ट्रँक्टरने पाण्यात नांगरटी करताना,शेतकऱ्यांच्या तक्रारी होतात,असं सौरभ बोलला. अनेकांच्या उपजिवीकेचं साधन जमिनीचा तुकडा हेच आहे.
बंगालच्या खेड्यात व्हिएतनाममधील गावाचं दर्शन घडलं. बांधा-बांधानी तोल सांभाळत चालताना मजा आली!
निवृत्त प्राचार्य रामकुमार सिंह हे सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते आहेत.अर्थशास्त्राचे प्राध्यापक राहिलेले सिंह आता सेंद्रिय शेती करीत आहेत. काल मंझोलमध्ये पुष्पराज व अली हुसेन यांच्यासोबत त्यांच्या शेतीला भेट दिली.
मंझोलचा हा इलेक्ट्रीक रिक्षावाला पुष्पराज चा खास माणूस. टुणटुण हे त्याचं टोपणनाव. काल बेगुसरायहून मंझोलला याच रिक्षाने आलो. मंझोलला अली हुसेन यांच्याकडं,शहराबाहेर ढोबळी मिरची प्लाट बघण्यासाठी याच रिक्षाने.
सावरापूर... प.बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एक गाव. कलकत्यापासून सुमारे १७५ कि.मी.अंतरावरचं.आजचा दिवस इथं घालवला.
गाव आणि शिवारातील सगळी शेती पाच कि.मी.फिरून बघितली...निताई माल यांचा पाहुणचार घेतला...लिहित बसलो तर पुस्तक होईल...
एक लेख तर नक्कीच लिहिन सवडीने. अनेक दिवसांनी दुसऱ्या राज्यातील खेडं अनुभवण्याची इच्छा पूर्ण झाली...
लाभपूर ला बस सोडली.तिथून पाच कि.मी.चा टमटमचा प्रवास करून एका खेड्यात आलोय.आदिवासी कुटुंबात. चुरमुरे(स्थानिक,चवदार) ,कसली तरी मुळ आणि काळ्या चहानं स्वागत झालं.