Monsoon Rain 2024 : मराठवाड्याला पावसाने झोडपले

Rain Update : कोकणानंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर मराठवाड्यातील अनेक गावांना पावसाने झोडपले असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.
Monsoon
MonsoonAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोकणानंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर मराठवाड्यातील अनेक गावांना पावसाने झोडपले असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तसेच लातूरमधील औराद, हलगरा मंडलांत सर्वाधिक प्रत्येकी १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर, पुणे भागांत काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. कोकणातही मुसळधार पाऊस सुरूच असून, अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

मराठवाड्यात अतिवृष्टी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या जिल्ह्यांत तब्बल २८ मंडलांत अतिवृष्टी झाली. अपवाद वगळता अनेक भागांत झालेला पावसामुळे शेतकरी सुखावले आहे. अतिवृष्टी झालेल्या या मंडलांमध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, धाराशिवमधील प्रत्येकी तीन, बीडमधील पाच व हिंगोलीतील सर्वाधिक सात मंडलांचा समावेश आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. या दोन जिल्ह्यांतील ७५ मंडलांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ७ मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. तर सावंगी म्हाळसा (ता. जिंतूर) मंडलांमध्ये आणि हत्ता (ता. सेनगाव) मंडलामध्ये १०० मिमीपेक्षा जास्त म्हणजेच अनुक्रमे १२० मिमी व १०६ मिमी पावसाची नोंद झाली. जोरदार पावसामुळे ओढे-नाले भरुन वाहिले आहेत. सोयाबीन, कपाशी, हळद आदी पिकांमध्ये पाणी साचले.

विदर्भात जोर कमी :

विदर्भातील अनेक भागांत मागील चार ते पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडला. त्यानंतर आता काहीसा जोर कमी झाला आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.

यात अकोला जिल्ह्यातील शिवणी मंडलात १०० मिलिमीटर, तर उगवा ९१, कौलखेड ८५.८ मिलिमीटर पाऊस पडला. अमरावतीतील आसेगाव मंडलात ११० मिलिमीटर, चंद्रपूरमधील कोपर्णा मंडलात ७२.८ मिलिमीटर पाऊस झाला. इतर भागातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या पावसामुळे पिके चांगलीच तरारली आहेत.

Monsoon
Monsoon Rain : पुढील ५ दिवस पाऊस कसा राहील? विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर :

नगर, सोलापूर जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांत सलगपणे पाऊस झाला. सोलापुरातील सांगोला तालुक्यातील सर्वच महसूल मंडलांत कमी- अधिक पावसाची नोंद झाली. पुन्हा दुसऱ्या दिवशीही अनेक भागात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवर पेरणी झालेल्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. नगर जिल्ह्यात बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सर्वदूर पावसाने हजेरी लावली.

जिल्हाभरातील सात महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसाने पिकांना दिलासा मिळाला आहे. अकोले तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. पुणे जिल्ह्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. आंबेगाव, पाटस, वरवंड या तीन मंडलांत अतिवृष्टी झाली. घोडेगाव येथे सर्वाधिक ७६.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. झालेल्या पावसामुळे मागील चोवीस तासांमध्ये सर्व धरणे मिळून एकूण २.०५ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी काही प्रमाणात वाढली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पावसाचा जोर काहीसा कमी होता.

कोकणात मुसळधार सुरूच :

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगडमधील नंदगाव मंडलात सर्वाधिक १८७.३ मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम असून, मंगळवारीदेखील (ता. ९) जोरदार पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे काही भागांतील पूरस्थिती कायम आहे. काळसे बागवाडीला पुराच्या पाण्याने वेढले असून, येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. तर पांग्रड येथील एका घरावर दरड कोसळली.

७२ कुटुंबातील ३७० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. पुरामुळे शेकडो मालमत्तांचे आणि शेतीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. किनारपट्टी वगळता उर्वरित जिल्ह्यांत पावसाचा जोर किंचित ओसरला आहे. रत्नागिरीत मागील दोन दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे दापोली, खेड, संगमेश्‍वर, रत्नागिरी, राजापूरमधील नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. मात्र पुरामुळे नदी किनारी भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पुनर्लागवड केलेली भात रोपे वाहून गेली आहेत. संगमेश्‍वर, दापोली, चिपळूण या तीन तालुक्यांतील २१ गावांतील १५९ शेतकऱ्यांना पुराच फटका बसला. रायगडमध्येही मुसळधार पाऊस बरसत आहे.

Monsoon
Monsoon Rain : संततधारेमुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती

१५० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली मंडले :

पोयनाड १६०.५, सरल १६८, चरी १६०.५, रामरज १६०.५, मुरूड १७७.५, गुहागर १६५, मालवण १५७.८, आजगाव १५९.८, आबेरी १६०.५, मांडवी १५५.८,

मानिकपूर १५५.८, निर्मल १५५.८.

मंगळवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडलनिहाय पाऊस, मिलिमीटर (स्रोत : कृषी विभाग)

कोकण : मुंबई सांताक्रूझ १२६.८, कुलाबा १४४.५, ठाणे १०२.५, भाइंदर १०५.८, मुंब्रा ८६.५, नडगाव ७१.३, देहरी ८८.३, अलिबाग १२२.५, चौल १२७.३, पनवेल ९१.५, ओवले, कर्नाळा ११६.८, कर्जत ८४.३, नेरळ १३९.५, चौक ८४.३, उरण १४४.३, कापरोली, जसई १२३.५, हमरापूर, वशी १२३.५, इंदापूर, निजामपूर ७१.५, रोहा १०२.५, चानेरा ९७.८, कोलाड ७१, पोलादपूर ६६.३, बवरली १२७.३, श्रीवर्धन ८३, वालवटी ८०, बोरलीपंचटण १२६, म्हसळा १३८, खामगाव १०१.८, तळा ११३.८, मेंढा ७१, दापोली ११६.८, बुरोंडी ९९, दाभोळ १४०.५, अंजर्ले ११६.८, वाकवली १४१.८, पालगड १००.५, वेळवी ११६.८, खेड १४१.८, शिर्शी ७४.८, भरणे १०४.३, दाभीळ ८६.३, तळवली, पाटपन्हाळे १०९.३, हेदवी ९०.८, मंडणगड ७४.५, रत्नागिरी, खेडशी १०४.५, पावस ७१.८, फसोप १०४.५, कोतवडे, मालगुंड ८०.५, तरवल ९४.५, लांजा १२७.८, साटवली ७०, पडेल १०९.८, पेंडूर ८८.८, मसुरे १५५.३, आचरा १३४, सावंतवाडी ८३.८, बांदा ८५.८, आबोली ७४.५, मडुरा ११३.३, वेंगुर्ला १०२.५, शिरोडा ११८.५, म्हापण १२५.५, वेतोरे ११२.३, कुडाळ १३८.५, वालावल १३७.८, माणगाव ७९, पिंगुळी १३०.५, भेडशी ७९.५, वसई १२९.३, अगशी ९३.८, विरार ९३.८.

मध्य महाराष्ट्र : सायणे १४२.५, मिरजगाव ८०.५, जामखेड ९३.५, खर्डा ९२.३, नायगाव ९३.५, पाथर्डी ७४.५, माणिकदौंडी ११७, आंबेगाव ७६, पाटस ७२.८, वरवंड ७५.०, दारफळ ९३.३.

मराठवाडा : चित्तेपिंपळगाव १०८.५, भेंडाळा ७९.८, रोहिलागड ७३.८, वाटूर ७३.५, ढोकसळ ७६.३, अमळनेर १०६.५, आष्टी ७३, धामनगाव ८५.५, धानोरा १०३.५, पानचिंचोली ९०, औराद १२१, हलगरा १२१, मोहा ७१.८, सावंगी म्हाळसा १२०.८, चारठाणा ८९.३, सिरसम ७४, सेनगाव, गोरेगाव, आजेगाव ७४, हत्ता १०६.५.

- खानदेशात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस.

- नगर, सोलापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला.

- विदर्भात कमीअधिक पाऊस.

- कोयना, धारावी घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस. - तुलसी धरणक्षेत्रात सर्वाधिक २१४ मिलिमीटर पाऊस.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com