Rain
Rain Agrowon

Maharashtra Rain Alert : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज

Monsoon Rain Update : मॉन्सून सक्रिय झाल्याने महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ढंगानी दाटी केली आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे.
Published on

Pune News : मॉन्सून सक्रिय झाल्याने महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत ढंगानी दाटी केली आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. १०) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीपासून दक्षिणकडे कायम असून, राजस्थानच्या जैसलमेर पासून, भिलवाडा, रायसेन, पूरी ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मध्य गुजरातमध्ये समुद्र सपाटीसाठी १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्रात परस्पर विरोधी वाहणाऱ्या पूर्व-पश्चिम वाऱ्यांचे जोड क्षेत्र तयार झाले आहे.

Rain
Monsoon Rain : पश्‍चिम विदर्भात मॉन्सून सक्रिय, खामगाव, बाळापुरांत अतिवृष्टी

मंगळवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार ते मुसळधार पाऊस कोसळला. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे २३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि दोडामार्ग, रायगड जिल्ह्यातील म्हसळा आणि मुरूड येथे २०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला. कोकणात अनेक ठिकाणी १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.

Rain
Maharashtra Rain : बीडमध्ये पावसाचा जोर अधिक

पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात पावसाचा हलक्या ते जोरदार सरींची शक्यता आहे. आज (ता. १०) कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाचा ' येलो अलर्ट' आहे. विदर्भासह, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता कायम आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, वाशीम, यवतमाळ.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com