Maharashtra Rains: कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार

Konkan Monsoon: राज्यात पंधरा दिवसांच्या दीर्घ खंडानंतर पुन्हा पाऊस परतला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे.
Maharashtra Rains
Maharashtra RainsAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यात पंधरा दिवसांच्या दीर्घ खंडानंतर पुन्हा पाऊस परतला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांत वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत सिंधुदुर्गमधील देवगड येथील आंबा फळ संशोधन केंद्र येथे ३०२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील ६४ मंडलांत अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.मे महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे उन्हाळी पिकांचे व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

Maharashtra Rains
Maharashtra Weather Forecast: पाऊस जोर धरण्याची शक्यता

त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी वेगाने शेतीकामे उरकत काही ठिकाणी पेरण्या केल्या आहेत. राज्यात खरिपाचे सरासरी १४४ लाख ३६ लाख हेक्टर एवढे क्षेत्र आहे.आतापर्यंत चार लाख १७ हजार हेक्टर म्हणजेच तीन टक्के पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात तीन लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली पेरणी झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेगात सुरुवात होईल.

सिंधुदुर्गात दमदार पाऊस

राज्यात २६ मे दरम्यान मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर अनेक ठिकाणी दमदार पाऊस होऊन नद्या, नाले, ओढे भरून वाहू लागले. धरणातील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. मध्यंतरी कमी झालेल्या पावसामुळे वेग मंदावला होता. परंतु पुन्हा पाऊस परतल्यामुळे ओढे, नाले प्रवाही झाले आहेत. कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांत पावसाच्या कमीअधिक सरी कोसळल्या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे भात खाचरे भरून वाहू लागल्याने भात लागवडीला वेग येण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rains
monsoon rain: पुढील दोन आठवडे मॉन्सूनचा पाऊस कसा राहील?

मध्य महाराष्ट्रात वादळी

मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. पुणे जिल्ह्यात पावसाने दुसऱ्या दिवशी चांगलाच दणका दिला आहे. वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. शिरूरमधील वडगाव, न्हावरा आणि निमोणे मंडलांत सर्वाधिक ६५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

त्यामुळे खरीप पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र पश्‍चिम भागात गुरुवारी (ता. १२) मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पेरण्या लांबणीवर पडणार असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. जिल्ह्यात आठवडाभर उसंत दिली होती.

मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर ऊन आणि सायंकाळी मध्यम पाऊस आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, राहाता, भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे केळीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

Maharashtra Rains
Pune Heavy Rain: वडगाव, न्हावरे येथे दमदार पाऊस

मराठवाड्यातही हजेरी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम होता. जालना जिल्ह्यात गुरुवारी (ता. १२) दुपारनंतर पावसाने जोर पकडला. जिल्ह्यात सरासरी २३.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसादरम्यान मंठा तालुक्यात वीज पडून एका जणाचा मृत्यू व एक जण जखमी झाला. दोन ठिकाणी वीज पडून शेतकऱ्याची बैल जोडी दगावली. अंबड शहरासह रोहिलागड परिसरात जोरदार पाऊस झाला.

रामनगर, विरेगाव महसूल मंडलांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली. कुंभार पिंपळगावसह परिसरात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी सहापासून पाऊस झाला. जालना तालुक्यातील बाजीऊमरद येथे वीज पडून शिवाजी डोंगरे यांचे दोन बैल दगावले. मंठा तालुक्यात उमरखेडा या गावी गौतम जाधव (वय ४२) यांचा वीज पडून मृत्‍यू झाला. आंबोडा कदम येथील शेतकरी शंकर महाजन (वय ६८) दुपारी शेतात काम करीत असताना तीनच्या सुमारास वीज पडली त्यात ते जखमी झाले.

अतिवृष्टी झालेली मंडळे

कोकण : गुहागर, पाटपन्हाळे ७३, पावसा १२९, राजापूर १३०, कोंडये ७४, जैतापूर १८०, कुंभावडे ९२, नाटे १४८, सातवली १२९, देवगड १७६, पडेल २५२, मीथबंब १३५, शिरगाव, तळेबाजार १७१, मालवण ८१, मसुरे १०३, श्रावण १०६, अंबेरी ६९, पोयीप ७१, आजगाव ९१, नांदगाव ८२, तलेरे ८३, वैभववाडी १२४, येडगाव ९३, गगनबावडा ७२, पन्हाळा ८१, हातकणंगले ७०.

मध्य महाराष्ट्र : नायगाव ६६, वडगाव, न्हावरे, निमोणे ६५, ढेबेवाडी ८२, चापल ६८, कुथरे ८२, मारूळ ९३, उंब्रज ७७, इंडोली ६९, कवठे ६९, कोपार्डे ७७, काळे ६५, बेडग ६५, उमाडी ७४, पेठ ७०, बाहे ६५, कामेरी ७१, शिर्शी ६५, आटपाडी ६७, पलूस ६७, हुपरी ९१, शिरढोण ९३, कोडाळी ७१, काळे ७०, बाजार ७६, कोतोळी ७०, करवीर ८७, हलदी ७३, इसपुरली ८१, कन्हेरी ७२, खडकेवाडी ७२. मराठवाडा : राजूर ६५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com