Heavy Rain Nanded : नांदेडला पाच तालुक्यांसह २६ मंडलांत अतिवृष्टी

Rain Update : मागील दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. या पावसाचे प्रमाण मोठे असल्याने अनेक तालुक्यात याचा परिणाम दिसून आला.
Heavy Rain
Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हदगाव, भोकर, किनवट, माहूर, व हिमायतनगर या तालुक्यासह तब्बल २६ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यात रविवारी (ता. १) सकाळी साडेआठला संपलेल्या २४ तासात सरासरी ५६.१० मिलिमीटर पाऊस झाला. हा पाऊस बारा मंडळात शंभर मिलिमीटर पेक्षा अधिक झाला. या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती सूत्राने दिली.

मागील दोन दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी जोरदार हजेरी लावली. या पावसाचे प्रमाण मोठे असल्याने अनेक तालुक्यात याचा परिणाम दिसून आला. शनिवारचा पाऊस विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या तालुक्यात सर्वाधीक झाला.

Heavy Rain
Heavy Rain : नांदेड, यवतमाळमध्ये पावसाचा दणका

या भागातील हदगाव, भोकर, किनवट, माहूर, व हिमायतनगर या तालुक्यासह तब्बल २६ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. या पावसामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांसह हळद, केळी, भाजीपाला या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अतिवृष्टीबाबत शासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यातील अनेक ठिकाणी नदी-नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत जिल्हा प्रशासन शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहे.

Heavy Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात १३० टक्के पाऊस; वेल्हा मंडलात सर्वाधिक

अतिवृष्टी झालेले मंडळ

हदगाव ७८.५०, तळणी ७८.७५, निवघा ६५, मनाठा ७२.५०, तामसा ८२.५०, पिंपरखेड ७३.७५, आष्टी ११२.७५, किनी ९५.५०, किनवट १४०, बोधडी ८१.२५, इस्लापूर १६५, जलधारा १३८, शिवणी १०२, मांडवा १५३.२५, दहेली ११२.२५, सिंदगी १७८.७५, उमरी बाजार १६०.२५, मुदखेड ६६.५०, हिमायतनगर ८०.५०, जवळगाव ११८.२५, सरसम १११.५०, माहूर ११७.५५, वानोळा ७६.२५. वाई ८८.७५, सिंदखेड ९१.५०, अर्धापूर ७२.७५.

तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड ४४.७०, बिलोली ३६.४०, मुखेड २४.२०, कंधार २०.९०, लोहा ३१.८०, हदगाव ८०.६०, भोकर ६६.५०, देगलूर २९.९०, किनवट १३६.८०, मुदखेड ५७.५०, हिमायतनगर १०३.४०, माहूर ९३.६०, धर्माबाद ३३.७०, उमरी ४९.७०, अर्धापूर ५०.७०, नायगाव ४५.

पाऊस थांबताच नुकसानीचे पंचनामे होतील. नागरिकांनी सतर्क असावे. पुलावरून पाणी वाहत असताना रस्ते ओलांडू नये. धोकादायक ठिकाणी जाऊ नये. जिल्हा प्रशासनाचे नुकसानी संदर्भात लक्ष असून सर्व यंत्रणा सज्ज आहे.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com