Rain Update : उंबर्डे, भुईबावडा परिसराला पावसाने पुन्हा झोडपले

Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (ता.१७) सायकांळी पुन्हा उंबर्डे, भुईबावडा परिसराला झोडपून काढले.
Rain Update
Rain Update Agrowon

Sindhudurg News : मॉन्सूनपूर्व पावसाने शुक्रवारी (ता.१७) सायकांळी पुन्हा उंबर्डे, भुईबावडा परिसराला झोडपून काढले. या भागात विजांच्या गडगडाटांसह सरीवर सरी कोसळत होत्या. दरम्यान, वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

जिल्ह्याला गुरुवारी (ता.१६) सायकांळी वादळीवाऱ्यांसह मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक गावाला वादळाचा सर्वाधिक तडाखा बसला. यामध्ये १०० हून अधिक मालमत्तांची पडझड झाली. याशिवाय कळसुली, हळवल परिसरात देखील जोरदार वादळ होऊन नुकसान झाले.

Rain Update
Crop Damage Survey : नुकसानीचे त्वरित पंचनामे करा

वैभववाडी तालुक्यातील मांगवली, उंबर्डे, कुसुर यांसह विविध गावांना वादळी पावसाचा तडाखा बसला. या परिसरातील १० ते १५ घरांचे नुकसान झाले. वादळात मांगवली, आखवणे भोम पुनर्वसन गावठाणातील ७०० हून अधिक काजूची झाडे वादळाने उन्मळून पडली. शुक्रवारच्या वादळी पावसात लाखो रुपयांची हानी झाली असून तहसील, कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहे. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Rain Update
Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

दरम्यान, शुक्रवारपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वैभववाडी तालुक्यात विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर सायकांळी चार-पाच वाजण्याच्या सुमारास उंबर्डे, भुईबावडा परिसराला मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. या भागात अर्धा तास जोरदार पाऊस झाला. सरीवर सरी कोसळत होत्या. सलग दुसऱ्या दिवशी या भागात जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्याच्या इतर भागांत देखील सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सावंतवाडी, कुडाळ तालुक्यांतील काही गावांमध्ये हलक्या सरी झाल्या. वैभववाडी शहरात देखील शिडकावा झाला. शनिवारी (ता.१८) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com