Pune News : उत्तर भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असताना राज्यासह, पुणे जिल्ह्यातील वातावरणात बदल होत आहे. पहाटे धुक्याची स्थिती, तर सकाळपासून ऊन पडत असले तरी दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत दौंड येथे ४७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता.
गेल्या आठवड्यापासून पावसाने जिल्ह्यात उघडीप दिली आहे. त्यामुळे कडक ऊन पडत असून कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. परंतु दुपारी काही प्रमाणात अचानक काळेकुट्ट ढग भरून येत आहे. गुरुवारी सकाळपर्यंत पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. त्यामुळे शेतीकामांमध्ये अडथळे येत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
दौंड तालुक्यातील रावणगाव येथे ४५ मिलिमीटर पाऊस पडला. तर केडगाव येथे २०, राहू २३ मिलिमीटर, तर देऊळगाव, पाटस, यवत, वरवंड, वडगाव, पारगाव, बोरी पार्धी येथे हलका पाऊस झाला. बारामतीतील उंडवडी २५ मिलिमीटर तर बारामती २९ मिलिमीटर पाऊस पडला असून माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव येथे तुरळक सरी बरसल्या.
इंदापुरातील अंथुर्णी येथे ३८ मिलिमीटर, तर सणसर २९, लोणी देवकर २५ मिलिमीटर, तर भिगवण, इंदापूर, काटी, निमगाव येथे शिडकावा झाला. मावळमधील लोणावळा येथे १७ मिलिमीटर, वेल्हा येथे २३ मिलिमीटर, तर पानशेत येथे तुरळक सरी कोसळल्या. हवेलीतील पुणे वेधशाळा, केशवनगर, खडकवासला, चिंचवड, खेडमधील चाकण, आंबेगावमधील घोडेगाव, शिरूरमधील वडगाव रासाई, न्हावरा, पाबळ, शिरूर, पुरंदरमधील परींचे येथे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.