Pune Heavy Rain: पुणे धरणक्षेत्रात पावसाचा जोर

Monsoon Update: पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रातधरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तर घाटमाथ्यावरही दमदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
Pune Rain
Pune RainAgrowon
Published on
Updated on

Pune News: पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर कमीअधिक होत आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. तर घाटमाथ्यावरही दमदार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत ताम्हिणी घाटमाथ्यावर सर्वाधिक २६० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. या पावसामुळे पुन्हा धरणांत आवक वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. प्रामुख्याने पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक आहे. मागील दोन दिवसांपासून पुन्हा या भागात पावसाने सुरुवात केली आहे. लोणावळा घाटमाथ्यावर १७५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

Pune Rain
Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर

तर वळवण घाटमाथ्यावर १३९ मिलिमीटर, कुंडली १०१, शिरोटा ८०, ठोकरवाडी ६३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे भात खाचरे भरून वाहत आहे. तर ओढे, नाले ओसंडून वाहत असून धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. मागील चोवीस तासांमध्ये ७.१६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

जिल्ह्यात धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तर पूर्व भागात पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण कायम आहे. मुळशी धरणक्षेत्रात १५४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात ९८ मिलिमीटर, वरसगाव ७०, पानशेत ६४, खडकवासला २३ मिलिमीटर पाऊस पडला.

Pune Rain
Heavy Rain Damage: अतिवृष्टीचा पश्‍चिम विदर्भाला तडाखा

नीरा खोऱ्यातील पवना धरणक्षेत्रात ९४ मिलिमीटर, वडिवळे ८१, गुंजवणी ७०, नीरा देवघर ५०, कळमोडी ४२, भामा आसखेड, भाटघर २६ मिलिमीटर, तर कासारसाई, वीर, नाझरे, चासकमान धरणक्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. शेटफळ, आंध्रा धरणक्षेत्रात पावसाची उघडीप होती. कुकडी धरणक्षेत्रात माणिकडोह १८ मिलिमीटर, डिंभे १६ मिलिमीटर पाऊस पडला असून पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, चिल्हेवाडी धरणक्षेत्रात पावसाचा शिडकावा झाला. तर घोड, विसापूर, उजनी धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण कायम होते.

धरणक्षेत्रात जूनमध्ये झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर १२७९, वरसगाव ९२९, पानशेत ९१७, खडकवासला ३६६, पवना १०२२, कासारसाई ५६५, कळमोडी ५४८, चासकमान ३५७, भामा आसखेड ३९३, आंध्रा ५६९, वडिवळे १०८१, नाझरे ९९, गुंजवणी १०३३, भाटघर ३८०, नीरा देवघर ८२१, वीर १४२, पिंपळगाव जोगे २३७, माणिकडोह २८५, येडगाव १५०, वडज २२५, डिंभे ४३३, चिल्हेवाडी २३४, घोड ६५, विसापूर २७, उजनी ७३, मुळशी २५७३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com