Nashik Rain : नांदगाव, निफाड, देवळा तालुक्यांत दमदार पाऊस

Rain Update : नाशिक जिल्ह्यात सोमवारी (ता. २४) नांदगाव, निफाड व देवळा तालुक्यातील काही मंडलांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सोमवारी (ता. २४) नांदगाव, निफाड व देवळा तालुक्यातील काही मंडलांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाने अक्षरशः दाणादाण उडवली. चालू आर्द्रा नक्षत्रातील पावसाने पाणीच पाणी झाले होते. तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पावसामुळे बांध फुटून पाणी वाहिले तर काही ठिकाणी पेरणी झालेली शेतजमीन वाहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अजूनही समाधानकारक पाऊस नसल्याने पावसाची प्रतीक्षा आहे. अशातच आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. निफाड तालुक्यातील विंचूर मंडलात झालेल्या अतिवृष्टीमुळे परिसर जलमय झाला होता. त्यामुळे वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. रोहित्र पाण्यात बुडाल्याने व विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

Rain Update
Heavy Rain : खानदेशात तीन दिवसांत अनेक भागांत पाऊस

दिंडोरीतील कसबे वाणी मंडलात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांतील ओढे-नाले भरून वाहिले, काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने काहीकाळ फोपशी, भातोडे या गावांचा संपर्क दोन ते तीन तास तुटला होता. शिंदवड परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली. पालखेड धरण समूहातील तिसगाव, ओझरखेड या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्या पात्रात पाणी आल्याने दिलासा मिळाला.

कळवण तालुक्यातील कळवण मंडलात पावसाचा जोर दिसून आला. निवाने, दह्याणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतीचे बांध फुटले तर निवाने-दह्याने पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरातही पावसाने सलामी दिली. देवळा परिसरात व तालुक्यात सोमवारी (ता. २४) दोन महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

Rain Update
Monsoon Rain : विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाज; राज्यभरात पुढील ४ दिवस ठिकठिकाणी पावसाची शक्यता

दमदार पावसामुळे भावडी, खाटकी अशा लहान नद्या खळाळून वाहिल्या. नांदगाव तालुक्यातील सारताळे, जामदरी, मुळडोंगरी, कळमदरी, मळगाव, आमोदे, बोराळे परिसरात सोमवारी (ता. २४) सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. येवल्यातील पूर्व भागात पांजरवाडी गुजरखेडे परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. शेतजमिनी पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने पेरलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

येथे झाली अतिवृष्टी पाऊस (मिमी मध्ये)

वेहेळगाव (नांदगाव) ८३.५

विंचूर (निफाड) ८८.३

देवळा (देवळा) ६७.३

लोहणेर (देवळा) ६७.३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com